शरद पवारांच्या NCP ची पहिली यादी जाहीर: बारामतीमध्ये युगेंद्र पवार, घनसांगवी राजेश टोपे, कागल मध्ये समरजीत घाडगे, बदनापूर मध्ये बबलू चौधरी: वाचा 45 जणांची यादी
महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात इस्लामपूर येथून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काटोल येथून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, घनसांगवी येथून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंब्रा- कळवा येथून पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड व इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या यादीनुसार स्वतः जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणुकीसारखीच हायव्होल्टेज लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा सामना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.
खाली वाचा उमेदवारांची यादी
- जयंत पाटील - इस्लामपूर
- अनिल देशमुख - काटोल
- राजेश टोपे - घनसांगवी
- बाळासाहेब पाटील - कराड उत्तर
- जितेंद्र आव्हाड - मुंब्रा कळवा
- शशिकांत शिंदे - कोरेगाव
- जयप्रकाश दांडेगावकर - वसमत
- गुलाबराव देवकर - जळगाव ग्रामीण
- हर्षवर्धन पाटील - इंदापूर
- प्राजक्त तनपुरे - राहुरी
- अशोकराव पवार - शिरुर
- मानसिंगराव नाईक - शिराळा
- सुनील भुसारा - विक्रमगड
- रोहित पवार - कर्जत जामखेड
- विनायकराव पाटील - अहमदपूर
- राजेंद्र शिंगणे - सिंदखेड राजा
- सुधाकर भालेराव - उदगीर
- चंद्रकांत दानवे - भोकरदन
- प्रदीप नाईक - किनवट
- विजय भांबळे - जिंतूर
- पृथ्वीराज साठे -केज
- संदीप नाईक - बेलापूर
- बापूसाहेब पठारे - वडगाव शेरी
- दिलीप घोडपे - जामनेर
- रोहिणी खडसे - मुक्ताईनगर
- सम्राट डोंगरदिवे - मूर्तीजापूर
- दिनेश्वर पेठे - नागपूर पूर्व
- रविकांत गोपचे - तिरोडा
- भाग्यश्री आत्राम - अहेरी
- रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी - बदनापूर
- सुभाष पवार - मुरबाड
- राखी जाधव - घाटकोपर पूर्व
- देवदत्त निकम - आंबेगाव
- युगेंद्र पवार - बारामती
- संदीप वरपे - कोपरगाव
- प्रताप ढाकणे - शेवगाव
- राणी लंके -पारनेर
- मेहबूब शेख - आष्टी
- नारायण पाटील - करमाळा
- महेश कोठे - सोलापूर शहर उत्तर
- प्रशांत यादव - चिपळूण
- समरजित घाटगे - कागल
- रोहित आर. पाटील - तासगाव कवठेमहांकाळ
- चरण वाघमारे - तुमसर
- प्रशांत जगताप - हडपसर





About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List