बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा अन् थेट अजित पवारांची उमेदवारी जाहीर; अजितदादा सह ३८ उमेदवारांची यादी जाहीर, वाचा कोण कोठून लढणार ?  

बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा अन् थेट अजित पवारांची उमेदवारी जाहीर; अजितदादा सह ३८ उमेदवारांची यादी जाहीर, वाचा कोण कोठून लढणार ?  

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. भाजप आणि शिंदे गटाने निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी 28 ऑक्टोबरला ते आपला अर्ज दाखल करणार आहेत. बारामती हे अजित पवारांचे गड मानले जाते, त्यामुळे त्यांच्या या उमेदवारीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढत होणार?  
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा होती. अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचं विधान केलं होतं. मात्र पहिल्याच यादीत अजित पवारांना बारामतीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे बारामतीत निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी
अजित पवार – बारामती
छगन भुजबळ – येवला
हसन मुश्रीफ-कागल
धनंजय मुंडे – परळी
नरहरी झिरवाळ – दिंडोरी
अनिल पाटील – अमळनेर
राजू कारेमोरे – तुमसर
धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
इंद्रनील नाईक – पुसद
चंद्रकांत नवघरे – वसमत
नितीन पवार – कळवण
माणिकराव कोकाटे – सिन्नर
दिलीप बनकर – निफाड
सरोज अहिरे – देवळाली
दौलत दरोडा – शहापूर
अदिती तटकरे – श्रीवर्धन
संजय बनसोडे – उदगीर
अतुल बेनके – जुन्नर
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
दिलीप मोहिते – खेड – आळंदी
दत्तात्रय भरणे – इंदापूर
यशवंत माने – मोहोळ
सुनिल शेळके – मावळ
मकरंद पाटील – वाई
शेखर निकम – चिपळूण
अण्णा बनसोडे – पिंपरी
सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
राजेश पाटील – चंदगड
चेतन तुपे – हडपसर
किरण लहामटे – अकोले
संजय शिंदे – करमाळा
देवेंद्र भुयार – मोर्शी
आशुतोष काळे – कोपरगाव
संग्राम जगताप – अहमदनगर शहर
प्रकाश सोळंके – माजलगाव
बाबासाहेब पाटील – अहमदपूर
सना मलिक – अणुशक्तीनगर
नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
अमरावती शहर – सुलभा खोडके
इगतपुरी – हिरामण खोसकरजाहिरात

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp