मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीची गोळी सुटून थेट 13 वर्षीय मुलाच्या पायात घुसली

मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीची गोळी सुटून थेट 13 वर्षीय मुलाच्या पायात घुसली

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या घरात धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षारक्षक नितीन शिर्के यांनी बंदुकीत राऊंड भरुन ती बॅग कपाटात ठेवली होती. मात्र त्यांच्या 13 वर्षीय मुलाच्या धक्क्याने ती बॅग खाली पडली आणि बंदुकीतून गोळी सुटून मुलाच्या पायाला लागली असल्याची घटना घडली आहे. अभय शिर्के (13) असे मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर सुरक्षारक्षक नितीन शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शिर्के हे तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडील परवाना असलेली बंदूक त्यांनी लोड करून कसलीही काळजी न घेता बंदुकीची बॅग कपाटात ठेवली. नंतर त्यांच्या मुलाने ते कपात उघडले, कपाटातून त्याने शर्ट काढून घातला, त्यानंतर पॅन्ट घालत असताना कपाटाला धक्का लागला आणि बंदुकीची बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. बंदुकीतून गोळी सुटताच ती अभय शिर्केच्या पायाच्या पोटरीला लागली. यात अभय जखमी झाला. घटना घडताच अभयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेबाबत पोलिस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरक्षारक्षक नितीन हनुमंत शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बंदुकीत राऊंड भरून ठेवल्यावर नितीन शिर्के यांनी कुठलीही खबरदारी घेतली नाही, तसेच याबाबत घरी माहिती देखील दिली नसल्याने हा अनर्थ घडला असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात                  IMG-20240920-WA0279            IMG-20240920-WA0276                     IMG-20240817-WA0005

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp