नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. 15 ऑक्टोबरला निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने दोनच दिवसांत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.
पोटनिवडणुकीसाठी जारी केलेल्या उमेदवारांच्या यादीत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच म्हणजे 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जून महिन्यात लागला. आणि त्याच्या दोन महिन्यांनी म्हणजे 26 ऑगस्टला खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
> निवडणूक अधिसूचना – 22 ऑक्टोबर 2024
> उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर
> उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख – 30 ऑक्टोबर 2024
> उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024
> मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर 2024
> निकाल – 23 नोव्हेंबर 2024


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List