मनोज जरांगेंकडे 800 इच्छुकांचे अर्ज ! निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात हालचाली वाढल्या

मनोज जरांगेंकडे 800 इच्छुकांचे अर्ज ! निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात हालचाली वाढल्या

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या राजकीय पटलावर स्वतःच्या ताकदीचा ठसा उमटवणाऱ्या मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी राज्यभरातून त्यांच्याकडे 800 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी झाली आहे.
इच्छुक उमेदवारांशी मी उद्यापासून संवाद साधेल. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तूर्त आमच्याकडे 800 हून अधिक इच्छुकांचे इर्ज प्राप्त झालेत, अशी माहिती जरांगेंनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यामुळे ते आपल्या निर्णयावर फेरविचार करत आहेत. ही इच्छुक राजकीय मंडळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये परतण्याच्या दिशेने विचार करत आहेत. विशेषतः या नेत्यांनी उमेदवारीच्या आशेने जरांगे यांच्या आंतरवाली सराटीतही गर्दी केली आहे.
शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर मराठवाड्यातील अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, प्राध्यापक रमेश बोरनारे, तानाजी सावंत या 9 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले. त्यामुळे या आमदारांच्या मतदारसंघांत पक्षसंघटना मजबूत करण्यासह नवे उमेदवार उभे करण्यावर उद्धव ठाकरे यांना जोर द्यावा लागणार आहे.
त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पैठनमध्ये राष्ट्रवादीतून दत्ता गोर्डे, पैठण येथीली संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे, वैजापूरमध्ये प्रा. बोरनारे यांच्याविरोधात दिनेश परदेशी यांना पक्षात प्रवेश दिला आहे.
यापूर्वी या मतदारसंघात भाऊसाहेब चिकटगावकर ठाकरे गटात प्रवेश केला होता. पण परदेशी यांच्या प्रवेशामुळे त्यांनी पुन्हा ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. सिल्लोडमध्ये मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांना अद्याप नवा भिडू मिळवता आला नाही. दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर बीड, परभणी, धाराशिव, लातूर, जालना या मतदारसंघातून शरद पवारांना भेटून येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.जाहिरात                  IMG-20240920-WA0276                     IMG-20240920-WA0279

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp