महाराष्ट्रात निवडणुकीचा धुमधडाका 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.
सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता.
दरम्यान, आज (दि. 15) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यंदा महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तर 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज माघे घेण्याची शेवटचा दिवस असणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. ग्रामीण भागात 57 हजार 601 आणि शहरी भागात 42 हजार 582 केंद्र आहेत. महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार हक्क बजावणार आहेत. तसेच वरिष्ठ नागरिक आपल्या घरून देखील मतदानाचा हक्क बजावू शकतील. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती?
महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601
शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
दिव्यांग – 6 लाख 2 हजार
नवमतदार – 1. 85 कोटी
पुरुष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List