राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधी विरोधात ठाकरे गटाची हायकोर्टात धाव; नियुक्त्या घटनाबाह्य असल्याचा दावा

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधी विरोधात ठाकरे गटाची हायकोर्टात धाव; नियुक्त्या घटनाबाह्य असल्याचा दावा

महायुतीचे राज्यपाल नियुक्त 7 आमदार ठरले आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. 12 पैकी 7 आमदारांना संधी देण्यात आली आहे.
आज दुपारी 12 वाजता आमदारांचा शपथविधी होईल. मात्र या शपथविधी विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी हायकोर्टाचा अंतिम निर्णय राखीव असताना आमदारांची नियुक्ती करणं असंविधानिक असल्याचा याचिकाकर्त्या ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीविरोधात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्रात राज्यपालांकडून सात विधान परिषद आमदार नियुक्तीचे आदेश दिले आहेत व त्यांचा आज दुपारी शपथविधी होत आहे. पण राज्य सरकारला असं करता येणार नाही असं म्हणत सुनील मोदी यांनी विरोध केला आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर 7 ऑक्टोबरला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर गेल्याच आठवड्यात सुनावणी पार पडली. त्यावेळी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करुन हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत स्पष्ट करताना निर्णय राखून ठेवताना हायकोर्टानं याप्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते, त्यामुळे नियुक्त्या कायदेशीर असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
कोणाला मिळाली संधी?  
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये भाजपचे 3, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रत्येकी 2-2 जण शपथ घेणार आहेत. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.
उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधान परिषद सदस्यांना शपथ देणार आहेत. आज दुपारी 12 वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे होणार आहे.जाहिरात                 IMG-20240920-WA0276                     IMG-20240920-WA0279

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp