कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव ; सविस्तर वाचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले १९ महत्वाचे निर्णय

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव ; सविस्तर वाचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले १९ महत्वाचे निर्णय

आज मंत्रिमंडळच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकाची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देणे, दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता, मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी यासारखे एकुण 19 निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
मागील  अनेक बैठकीत निर्णयांचा सपाटा लावणाऱ्या महायुती सरकारकडून या बैठकीतही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेच्या घोषणेकडे लक्ष असतानाच राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर बैठक बोलवण्यात आली होती. ही मंत्रिमंडळाची शेवटची कॅबिनेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय –
1. मुंबईतील ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
हेही वाचा: 
शिंदे सरकारची मोठी घोषणा ! मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफी ; आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणीजाहिरात                IMG-20240920-WA0276                     IMG-20240920-WA0279

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp