निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ अडचणीत? : आव्हान याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ अडचणीत? :  आव्हान याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतर दोघांनी कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना मिळलेल्या दोषमुक्तीविरोधात कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना दोषमुक्ती मिळाली होती. एसीबीच्या विशेष न्यायालयाने 9 सप्टेंबर 2021 रोजी हा निर्णय दिला होता. याच निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आव्हान दिले आहे. अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याजिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर एप्रिलमध्ये न्यायालयाने भुजबळ कुटुंबीयांना नोटीसा देखील बजावल्या होत्या. पण सुनावणी थंडावली होती. या आव्हान याचिकांवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी, यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढू शकतात.

काय आहे हा घोटाळा ? छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळी जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाला, असा आरोप होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणामध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयाने देखील भुजबळ यांच्याविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते. यामध्ये समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांचा समावेश होता.

भुजबळ 2 वर्षे होते तुरुंगात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर भुजबळ यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली होती. या प्रकरणात मार्च 2016 मध्ये छगन भुजबळ यांची 10 तासांपेक्षा अधिक चौकशी झाली होती. यावेळी त्यांना अटक झाली होती. त्यानंतर भुजबळ सुमारे 2 वर्ष तुरुंगात होते.

जाहिरात                IMG-20240920-WA0279            IMG-20240920-WA0276                     IMG-20240817-WA0005

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp