तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन यांचे निधन:मनमिळावू स्वभावामुळे प्रसिद्ध; 'तारा' वरील पान ठरले 'स्टेटस सिम्बॉल'
छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपूरा येथील प्रसिद्ध तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन सिद्दीकी यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. संभाजीनगरच नव्हे तर राज्यभरातील पान प्रेमींना हाजी शरफोद्दीन हे परिचित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे तारा पान सेंटरचे पान प्रसिद्ध झाले, असे म्हटले ती वावगे ठरणार नाही. उस्मानपूरा परिसरातील बडी मस्जिद येथे नमाज-ए-जनाजा अदा केली जाईल. तर दफनविधी उस्मानपूरा कब्रस्तानात होणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आपल्या देशामध्ये विड्याच्या पानाचे एक वेगळेच महत्त्व आहे. पूजेपासून ते कोणत्याही खास कार्यक्रमामध्येही पानाचा उपयोग केला जातो. काही गावांमध्ये आजही लग्नातील वऱ्हाडी लोकांना पान देऊन स्वागत केले जाते. पान आपल्या देशातील सर्वात प्राचीन आणि जास्त पसंत केली जाणारी एक गोष्ट आहे. आयुर्वेदानुसार पान यौन शक्ती वाढवण्यासही मदत करते. परंतु काही लोक माऊथ फ्रेशनरसाठी पानाचा वापर करतात. याचा पानाला छत्रपती संभाजीनगरच्या तारा पान सेंटरने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. 'तारा' वरील पान खाने हे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. याचे सर्वाधिक श्रेय हे हाजी शरफोद्दीन यांना जाते.
कोहिनुर पानाची चर्चा
येथे कोहिनुर पानाची चर्चा ही केवळ शहरातच नाही तर राज्यात होत असते. हे पान विशेषतः कपलसाठी बनवले जाते. असे सांगितले जाते की, हे पान खाल्ल्याने कपलमधील प्रेम वाढते. यासोबतच या पानाचा प्रभाव दोन दिवस राहतो असाही दावा केला जातो. सामान्यताही पानाची किंमत 10, 20 किंवा मग 100 रुपयांपर्यंत असते परंतु या पानाची किंमत 5000 रुपये आहे. यामुळेच या पानाचे नाव 'कोहिनुर' ठेवण्यात आले आहे. हे पान पुरुष आणि महिला दोघांसाठीही वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. हे खास पान कस्तुरी आणि केशरने बनते. यामध्ये एकप्रकाचे लिक्विड टाकले जाते, जे पश्चिम बंगालवरून मागवले जाते. लोक या पानाला 'देशी व्हायग्रा' नावानेही ओळखतात.
आईकडून मिळाला वारसा
मोहम्मद शरफुद्दीन सिद्दीकी गेल्या तीन दशकांपासून हे पान विकत होते. हे पान ते फक्त विवाहित जोडप्यांना देत होते. या विषयी सिद्दीकी सांगायचे की, 'माझ्या आईने मला हे पान दिले आणि ते खायला सांगितले. तसेच आवडले तर विकायला सांगितले. त्या दिवसापासून, मी माझ्या दुकानाच्या मेनूमध्ये हे पान समाविष्ट केले. या पानाची रेसिपी फक्त त्यांच्याकडेच होती, अशी देखील चर्चा आहे.




About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List