रतन टाटांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत!

रतन टाटांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत!

मुंबई : प्रतिनिधीज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. याबरोबरच, रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हा समाजउभारणीचा प्रभावी मार्ग आहे. नवनवीन उद्योगांच्या उभारणीमुळेच देश प्रगतिपथावर नेता येतो. रतन टाटा यांच्यासारख्या विचारवंत आणि समाजसेवकांनी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती प्रामाणिक कळवळा बाळगला. त्यांनी उद्योगक्षेत्रातच नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले.
रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट परोपकारी काम केले. त्यांच्या नैतिक मूल्यांची जपणूक इतर उद्योजकांसाठी व उद्योगातील भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. स्वातंत्र्यानंतर देशाची पुनर्निर्मिती करण्यामध्ये टाटा समूहाचा सिंहाचा वाटा होता.
रतन टाटा यांचे नाव मोटारीपासून मिठापर्यंत, आणि कॉम्प्युटरपासून कॉफी-चहापर्यंत अनेक उत्पादनांशी जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा आणि कोविड काळात पीएम रिलीफ फंडाला दिला गेलेला १५०० कोटी रुपयांचा मदतीचा हात अद्वितीय होता. यावेळी त्यांनी रुग्णांसाठी आपल्या हॉटेलचा वापर देखील केला, ज्यामुळे त्यांचा समाजातील मोठेपणा सिध्द झाला.
रतन टाटा नेहमीच तरुणांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यात आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात त्यांनी तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी इनोव्हेशन सेंटर सुरू केले. त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यातून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली.जाहिरात                IMG-20240920-WA0276                     IMG-20240920-WA0279

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp