टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन : भारतीय उद्योग समूहाचा आधारवड गेला
मुंबई:- टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे दीर्घ आजारामुळे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे जवळपास 22 वर्ष अध्यक्ष होते. त्यांच्या वर मुंबईतील ब्रिचकँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले होते, जगभरामध्ये या उद्योग समूहाचा विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.उद्योगधंद्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मितभाषी आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व असे टाटांची ख्याती होती. रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगताचा आधारवड कोसळला आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला होता. दहा वर्षाचे असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले, आजीने त्यांना वाढवलं त्यांचा सांभाळ केला त्यांनी आर्किटेक्चर मध्ये अमेरिकेतील कॉर्नर विद्यापीठातून पदवी घेतली. 1961 साठी टाटा स्टीलमध्ये मॅनेजर पदावर कारकीर्दीला सुरुवात केली त्यानंतर टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांवर कार्यरत होते.1991 मध्ये जीआरडी टाटांकडून टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली अध्यक्ष बनल्यावर टाटा समूहातील अनेक दिग्गजांकडून कडाडून विरोध झाला होता त्यावर उपाय म्हणून या कंपन्यांमधील टाटा समूहाची मालकी रतन टाटांनी वाढवली आणि मजबूत केली सर्व अध्यक्षांनी व्यवस्थापकीय संचालकांना निवृत्तीचे वय कंपल्सरी केलं, समूहातील सर्व कंपन्या टाटा सन्स या एकाच कंपनीच्या समूह मध्ये आणले , अनेक दीर्घ निर्णय त्यांनी घेतले टाटा स्काय कंपनी जागतिक स्तरावर यशस्वी व्हावी म्हणून अनेक मोठे बदल केले. टाटा इंडिका कार लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. टाटा नॅनो कार देखील त्यांचीच संकल्पना होती. ताज हॉटेल, टाटा मोटर्स, क्रोमो, टायटन, टाटा टी, फास्टट्रॅक, टाटा समूहाला खऱ्या अर्थाने जागतिक बनवण्याचे श्रेय रतन टाटांना जातं महाराष्ट्र जनशक्ती न्युज समूहाकडून रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List