तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा

तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा

गुंगीचे औषध पाजून काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. पीडितेच्या मित्रानेच हा काटा काढला आहे. कोयत्याने एकापाठोपाठ 50 वार करून ही हत्या केली आहे. स्वयम परांजपे (33) असे मृत बिल्डर पुत्राचे नाव आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी मयुरेश धुमाळला ताब्यात घेतले आहे.

स्वयम परांजपे हा 28 एप्रिल रोजी एका लग्नसमारंभात गेला असताना त्याची 20 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. त्यावेळी स्वयमने तिला कारने घरी सोडतो असे सांगत सोबत घेऊन निघाला. मात्र वाटेत असताना त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला. तिथे स्वयमने मोबाईलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले. काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तगादा लावला. स्वयम सतत ब्लॅकमेल करत असल्याने मुलीने हा सर्व प्रकार तिचा मित्र मयुरेश याला सांगितला. त्यानंतर संतापलेल्या मयुरेशने कोपरीच्या अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीत राहणार्‍या स्वयमवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली.

सखोल तपास सुरू

कोपरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. मयुरेश याने स्वयमची हत्या का केली, खरेच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का, की या हत्येमागे आणखी काही कारण आहे याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली.जाहिरात              IMG-20240814-WA0257IMG-20240920-WA0276

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp