प्रक्षोभक भाषण प्रकरणी : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर नावाला काळे फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी माजी खासदार व एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांच्यासह त्यांचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवर पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९२, १९६, १९७ (अ), २९९), ३०२, ३५१, ३५२, ३५३ नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात महेश पांडुरंग भोईबार (वय-२८,रा.कोंढवा, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार सदर घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृध्दी पास, देवळवाडी फाटा, माहिको कंपनी, शेलगाव ब्रीज, मात्रेवाडी आदी ठिकाणी घडली आहे. एमआयएम या राजकीय पक्षाचे नेते इम्तियाज जलील व त्यांचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काढलेल्या रॅलीत दोन धार्मिक समूहात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने ‘ ये औरंगजेब का आबाद शहर था, और रहेगा, इसे हम संभाजीनगर बनने नही देंगे’ असे प्रक्षोभक भाषण केले.
छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील नामनिर्देशीत फलकावरील छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील विविध ठिकाणांच्या फलकांना काळे फासून त्यांनी विद्रुप केले आहे. पोलिस उपायुक्त आर राजा यांनी याबाबतचा गुन्हा कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपासाकरिता संबंधित हद्दीतील पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली आहे.




About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List