छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली ; विशेष विमानाने मुंबईला हलवण्यात आले
मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती अचानक बिघडल्यामुळे छगन भुजबळ यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले.
छगन भुजबळ गुरूवार दि. २६ सप्टेंबर रोजी पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने छगन भुजबळ यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या छगन भुजबळ यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्येही अस्वस्थ वाटू लागल्याने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हा व्हायरल इन्फेक्शनमुळे छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List