मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द ; करोडो रुपयांचा खर्च वाया

मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द ; करोडो रुपयांचा खर्च वाया

पुणे : प्रतिनिधी :-

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या सावटामुळे पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार आहे.
तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. पुण्यातील विविध विकासकामांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार होते. तसेच आज संध्याकाळी त्यांची एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार होती. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण दौरा होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आता मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. अवघ्या २ महिन्यांवर आलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून राष्ट्रीय नेतृत्वांचेही महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रात अनेकदा आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा जे. पी. नड्डा असोत, काही दिवसांत ते महाराष्ट्रात येऊन गेले आहेत.
आज पुन्हा पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौ-यावर येणार होते. पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे तसेच विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार होते. तसेच पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तेथे ते पुणेकरांना संबोधित करणार होते. मात्र त्यांच्या या सभेवर पावसाचे सावट घोंघावत होते. त्यामुळे अखेर मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात त्यांचा हा दौरा पुन्हा नियोजित केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.IMG-20240920-WA0276            IMG-20240920-WA0279          Narendra Modi HD Png _ Indian Prime Minister Narendra modi png image_1660989641_1460009155

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp