मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित : मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा; नेत्यांच्या सभेला न जाण्याचे आवाहन

मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित : मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा; नेत्यांच्या सभेला न जाण्याचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या 9 व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. माझ्या माय माऊल्यांनी त्यासाठी मला वारंवार विनंती केली. त्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याचे मनोज जणांनी पाटील यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी - ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला, त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज एकच असल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला, हे एक चांगले झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्या आंदोलनामुळे मुलींना मोफत शिक्षण मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला. नेत्यांना आणि त्यांच्या मुलालाच मोठा करू नका. तुमच्या लेकींचे वाटोळ करू नका, मुलींला धोका देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही, असे आवाहन देखील त्यांनी केले. घरी बसून रहा पण नेत्यांच्या सभेला आणि प्रचाराला जाऊ नका, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.

मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नये मराठा नेत्यांनी एकमेकांना साथ द्या, मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मराठा समाजातील माता बहिणी मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी येथे येत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचे हाल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर गावाच्या देखील काही समस्या आहेत. माता भगिनींनी मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे, त्यांनाही इशारा देत त्यांनी सुरुवात केली आहे, त्याचा शेवट मराठाच करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

IMG-20240817-WA0005                          IMG-20240817-WA0005                          IMG-20240920-WA0276           IMG-20240920-WA0279

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp