मराठा आंदोलकांचा संयम सुटला: थेट तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली; संभाजीनगर( औरंगाबाद ) येथील घटना
मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालला असल्याचे चित्र आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8 वा दिवस आहे. पण सरकारने अद्याप त्याची दखल घेतली नाही. यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी आंदोलकांनी हे कृत्य केले. तसेच भविष्यात याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण त्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यासंबंधी आंतरवाली सराटी येथून जवळच असलेल्या वडीगोद्री येथे प्रत्युत्तरादाखल उपोषण सुरू केले आहे. त्यांच्याही आंदोलनाला संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. वडीगोद्री हे आंतरवाली सराटीला जाणाऱ्या रस्त्यातच आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठा व ओबीसी आंदोलक समोरासमोर येण्याच्याही घटनाी घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.
धनगर समाजही एसटी आरक्षणासाठी आक्रक
दुसरीकडे, धनगर समाजानेही अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. या समाजाने सोमवारी राज्यभर रास्तारोको केला. त्यांच्या आंदोलनाची सरकारने सकारात्मक दखल घेत या प्रकरणी जीआर काढण्याचे संकेत दिलेत. पण त्याला सत्ताधारी महायुतीच्या आदिवासी आमदारांनी कडाडून विरोध केला आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या एसटी कोट्यातून आरक्षण दिले तर 50 हून अधिक आदिवासी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे देतील असा निर्वाणीचा इशारा त्यांनी या प्रकरणी सरकारला दिला आहे.
सरकारचा स्थिती जैसे थे ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न
आरक्षणाच्या या मागण्यांमुळे राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या स्थितीत जैसे थे परिस्थिती ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका सरकारने घेतल्याचे दिसते. त्यामुळेच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 8 दिवस होऊनही सरकारने अद्याप त्याची दखल घेतली नाही. यामुळे मराठा आंदोलकांनी हळूहळू आपले आंदोलन उग्र करण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसते.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List