सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी

सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी

नागपूर:-

IMG-20240817-WA0005                       आमचे सरकार पुन्हा येण्याची गॅरंटी नाही. मात्र सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवले पुन्हा मंत्री होतील याची गॅरंटी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी बोलत होते.

नागपुरात मारवाडी फाऊंडेशनतर्फे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी रामदास आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आतापर्यंत तीन वेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा सरकार आल्यानंतर आपण मंत्री होणारच असे ठामपणे सांगितले.

आठवले यांच्या वक्तव्यावर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात प्रतिक्रिया दिली. आपल्या भाषणात बोलताना गडकरी यांनी आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते मंत्री होण्याची गॅरंटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी आठवले यांचे मंत्रिपद पक्के आहे, असे म्हटले आहे.

रामदास आठवले हे राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ असून त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते याचा अंदाज येतो, असे म्हणत गडकरींनी आठवलेंना कोपरखळी मारली आहे. रामदास आठवलेंना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आयुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करतो. आठवलेंनी त्यांचं आयुष्य दलित, पीडित, शोषित माणसांसाठी दिलेलं आहे. या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात ते यशस्वी होतील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला आहे.IMG-20240920-WA0279     IMG-20240920-WA0276      WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM         IMG-20240817-WA0005                       Ramdas-Athawale

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp