वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर : विधानसभा निवडणुकीत रावेरमधून ट्रान्सजेंडर शमिभा पाटलांना तिकीट

वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर : विधानसभा निवडणुकीत रावेरमधून ट्रान्सजेंडर शमिभा पाटलांना तिकीट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा या ट्रान्सजेंडर असून, लेव्हा पाटील आहेत.

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने शनिवारी एका ट्विटद्वारे आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत वंचितने उमेदवाराच्या नावासह त्याच्या जातीचाही उल्लेख केला आहे.

कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?

वंचित बहुजन आघाडीने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील या ट्रान्सजेंडर असून, लेव्हा पाटील आहेत. सिंदखेड राजा येथून पक्षाने सविता मुंढे यांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय वाशिम येथून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून नीलेश टी विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोळी मतदारसंघात डॉक्टर अविनाश नान्हे, नांदेड दक्षिण येथे फारुख अहमद यांना, लोहा विधानसभेत शिवा नरंगळे यांना, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे यांना उमेदवारी दिली आहे.

याशिवाय वंचित बहुजन आघाडीने शेवगाव विधानसभेची उमेदवारी किसन चव्हाण यांना दिली आहे. तर खानापूर विधानसभेसाठी वंचितने संग्राम कृष्णा माने यांना मैदानात उतरवले आहे.

BAP व GGP च्या 2 उमेदवारांची घोषणा

वंचितने आपल्या आघाडीतील भारत आदिवासी पार्टी (बीएपी) व गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी) या 2 पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचीही घोषणा केली आहे. वंचितने बीएपीच्या अनिल जाधव यांना चोपडा (एसटी) या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर जीजीपीच्या हरीश उईके यांना रामटेक येथून मैदानात उतरवले आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे वंचितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

WhatsApp Image 2024-09-21 at 4.48.38 PM WhatsApp Image 2024-09-21 at 4.48.38 PM

जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीने या यादीद्वारे जातीय समीकरणही साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाने या यादीच्या माध्यमातून लेव्हा पाटील, वंजारी, बुद्धिस्ट, लोहार (ओबीसी) धीवर, मुस्लीम, लिंगायत, मराठा, पारधी (आदिवासी) व वडार समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.

IMG-20240817-WA0005                  IMG-20240817-WA0005                  WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)
Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp