यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईचा स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर.
आज २१ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार
अंबाजोगाई:-
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी समाजकारण, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, नाटक, सिनेमा आदी क्षेत्रात उतुंग कार्य केलेल्या एका मान्यवरास स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा बारावा पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पद्मश्री सतीश आळेकर, पुणे यांना दिला जाणार आहे.
पद्मश्री सतीश आळेकर हे गेली पन्नास वर्षापेक्षा आधिक काळ नाटककार म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्याच बरोबर सिनेमा पटकथा लेखन त्यांनी केलेलं आहे. नाटक व सिनेमात त्यांनी अभिनयाबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांचे कार्य रसिकांच्या मनामनात आहे. जीवरसायन शास्त्रात त्यांनी पदवी प्राप्त केली आणि अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर ते नाटक लिहिणे आणि नाट्य चळवळ गतिमान करण्यात यशस्वी झाले. त्यांची मिकी आणि मेमसहेब, महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, शनवार रविवार, पिढीजात आदी नाटके प्रसिद्ध व लोकाभिमुख झाली. झुलता पूल, सामना आदी एकांकिका या सर्वोत्तम लोकप्रिय झाल्या होत्या. जैत रे जैत या मराठी सिनेमाचे पटकथा लेखन त्यांनी केले. अनेक नाटकाचे दिग्दर्शन व अभिनय पण त्यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आक्रित, उंबरठा आदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
अंबाजोगाई येथे त्यांच्या अनेक नाटकांचे प्रयोग झाले होते.
त्यांना या कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या नाट्य व सिने क्षेत्रातील हे कार्य पाहता या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना न्या.अंबादास जोशी, माजी न्यायमूर्ती हायकोर्ट व लोकायुक्त गोवा राज्य यांच्या हस्ते व नाट्य कलावंत चंद्रकांत काळे यांच्या विशेष उपस्थितीत देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचवीस हजार रुपये असे आहे.
यापूर्वी हा पुरस्कार, यशवंतराव गडाख - पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, उल्हास दादा पवार, प्राचार्य रा. रं. बोराडे व पद्मश्री डॉ. यु. म. पठाण व प्रा. भास्कर चंदनशिव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
या वर्षीचा बारावा पुरस्कार सतीश आळेकर यांना शनीवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे दुपारी चार वाजता प्रदान करण्यात येईल. अशी माहिती दगडू लोमटे यांनी दिली आहे.

.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List