मी आजारी असताना देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले, पहिले ही हेवेदावे होते, गटबाजी होती परंतु आता घरात घुसून मारायची ही कोणती राजकीय संस्कृती काँग्रेस नेत्याचा खळबळ जनक आरोप

मी आजारी असताना देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले, पहिले ही हेवेदावे होते, गटबाजी होती परंतु आता घरात घुसून मारायची ही कोणती राजकीय संस्कृती काँग्रेस नेत्याचा खळबळ जनक  आरोप

मी आजारी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकराव चव्हाण यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बोलत होते. त्यांच्या वक्तव्याने तुळजापुरात चर्चांना उधाण आले आहे.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, आम्हाला अस्वस्थ करून आमची बदनामी केली. याचे दुःख आम्हाला आहे. त्यामुळे त्यांनी केलेले हे पाप कधी ना कधी त्यांना फेडावे लागेल. भाजप काँग्रेसने लावलेले ग्रामीण भागाच्या विकासाचे रोपटे तोडण्याचे काम करत आहे. मी आजारी असताना फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले, असे म्हणत फडणवीसांवर आरोप केले आहे.

आमदार राणांवर टीकास्त्र

मधुकरराव चव्हाण म्हणाले की, मी 90 वर्षाचा तरुण पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो. खोंडावर पेरणी व्यवस्थित होत नाही,असे म्हणत आमदार राणा जगजीत सिंह यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मधुकर चव्हाण यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे सर्वात जेष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते.

ही कोणती संस्कृती

मधुकरराव चव्हाण म्हणाले की, मी 1985 साली उस्मानाबाद विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिकिटावर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उभा राहिलो.आम्ही कधी गुंडगिरी केली नाही. मात्र गुंडगिरीच्या विरोधात आम्ही ताकद वापरली. मात्र त्यावेळी माझा अवघ्या 4000 मतांनी पराभव झाला. मी 22 व्या वर्षी राजकारणात आलो. पूर्वी देखील हेवेदावे आणि गटबाजी होती. त्यावेळी विचारांची लढाई होती. मात्र आज घरात घुसून मारायचे प्रकार वाढले आहेत. ही कोणती संस्कृती आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

IMG-20240904-WA0422                                    IMG-20240817-WA0005               IMG-20240817-WA0005               IMG-20240817-WA0005               WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)                                                        WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM                               WhatsApp Image 2024-09-20 at 7.30.52 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp