आमदार संजय गायकवाडांनी माझी जमीन बळकावली, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिलेने झळकावले पोस्टर्स

आमदार संजय गायकवाडांनी माझी जमीन बळकावली, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिलेने झळकावले पोस्टर्स

एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करणार्‍या शिंदे  सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी एका महिलेची जमीन हडपल्याचे समोर आले आहे. सदर प्रकारचे आरोप करीत महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमानंतर मला माझी जमीन परत करा व न्याय मिळवून द्या असे बॅनर भर कार्यक्रमात झळकवले तसेच काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

मोताळा येथे रिता उपाध्ये या महिलेची गट नंबर 62 मध्ये दीड एकर जमीन आहे. ही जमीन आमदार संजय गायकवाड यांनी बळकावली असल्याचा महिलेने आरोप केला. 2021 पासून आमदार गायकवाड यांनी जबरदस्तीने व बेकायदेशीरपणे सदर जमीन ताब्यात घेत त्यातील मुरूम उत्खनन केले व त्यावर फार्म हाऊस बनविले. दिपाली चौबे या महिलेसोबत संगनमताने आमदारांनी ही जमीन हडपली. दरम्यान या प्रकरणी सदर महिला सर्व पुरावे घेऊन न्यायालयात गेली असून न्यायालयाने बुलढाणा आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांकडून 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पीडित महिलेने आज न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बुलढाणा येथील लाडकी बहीण कार्यक्रमानंतर बॅनर झळकवून व काळे झेंडे दाखवून ‘आपल्याच पक्षाचे नेते जर असा अन्याय अत्याचार करत असतील तर महिलांचे काय होणार?’ असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना केला आहे. त्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. फक्त स्वार्थासाठी लाडकी बहीण आहे हे या सरकारच्या व आमदारांच्या कृतीवरुन सिद्ध होते असे रिता उपाध्ये म्हणाल्या.IMG-20240904-WA0422                                IMG-20240817-WA0005           WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)                                                     WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp