( One Nation One Election )च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सूत्रांची माहिती


वन नेशन, वन इलेक्शन’च्या (One Nation One Election) मुद्द्यावर केंद्र सरकार ठाम असून आता यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी देखील देण्यात आल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तवाहिन्यांवरून देण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारकडून याबद्दल अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षीच केंद्र सरकारनं या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं होतं. केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) कायद्यावर काम करण्यासाठी समितीची स्थापना केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणांमध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा उल्लेख केला आहे. निवडणुकींमध्ये देशाचा अमाप पैसा खर्च होतो, तसेच सरकारच्या योजनाही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची वकिली मोदी करतात. आता त्याच दृष्टीने केंद्र सरकारनं आता त्या दिशेनं आणखी पुढचे पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे.


वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजे लोकसभा निवडणुका आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना आहे. ही कल्पना यापूर्वी अनेकदा मांडण्यात आली आहे आणि हिंदुस्थानच्या कायदे आयोगाने त्याचा अभ्यास केला आहे.

स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. मात्र त्यानंतर 1968 आणि 1969मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जिक करण्यात आल्या. त्यानंतर 1970मध्ये लोकसभाही भंग करण्यात आली आणि एकत्र निवडणुकांची परंपरा तुटली. तेव्हापासून आजतागायत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झालेल्या नाहीत.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेसमोर मांडलं जाईल अशी चर्चा सुरू आहे.

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp