भाजप नेत्याने पोलिसाला युनिफॉर्म उतरवण्याची दिली धमकी, पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच फाडला युनिफॉर्म ; संपूर्ण बातमी व्हिडिओ सह वाचा आणि पहा
भाजप नेत्याने एका पोलीस अधिकाऱ्याला गणवेश उतरवण्याची धमकी दिली. तेव्हा चिडलेल्या या अधिकाऱ्याने कार्यालयातच आपला गणवेश फाडला. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली असून नाल्याचा कामावरून हा वाद झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मध्य प्रदेशच्या सिंगरौली भागात वॉर्ड क्रमांक 44 मध्ये पोलीस अधिकारी विनोद मिश्रा राहतात. त्यांच्या घराच्या समोर एक नाला आहे. या नाल्याचे सतत काम निघत राहतं. त्यामुळे मिश्रा यांना घराबाहेर पडताना नेहमी त्रास होतो. त्यामुळे मिश्रा यांनी हा नालाच बंद केला. तेव्हा या विभागाच्या नगरसेविकाचे पती अर्जून दास तिथे आले. दास आणि मिश्रा यांच्यात नाल्यावरून वाद झाला. हा वाद महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहोचला. तेव्हा भाजप नेते अर्जून दास गुप्ता यांनी मिश्रा यांचा गणवेश उतरवण्याची भाषा केली. तेव्हा चिडलेल्या मिश्रा यांनी आपला गणवेश फाडला आणि फेकून दिला.
या वॉर्डाच्या नगरसेविका या गौरी गुप्ता आहेत पण त्यांचे पती अर्जून दास गुप्ता कामात नेहमी दखल देतात अशी तक्रार होत आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करून भाजप सरकारवर टीका केली आहे.
यह सत्ता की हनक है…भाजपा के पार्षद की धमक देखिए…एक वर्दीधारी को अपनी वर्दी फाड़ना पड़ गई !!
प्रदेश में पुलिसिंग का स्तर जीरो हो गया है! अपराध अनियंत्रित हैं, अपराधी बेखौफ और पुलिस कहीं लाचार तो कहीं दबाव में है.
यह वायरल वीडियो सिंगरौली के बैढन थाने का बताया जा रहा है, जहां… pic.twitter.com/tCDRUpC3S0
— MP Congress (@INCMP) September 16, 2024
या घटनेचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://youtu.be/GFTMyjOlO1g?si=tO7IQAFE_t7B4l0Z



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List