नांदेड अन् मुंबईत भाजप विरोधी पोस्टर्स:'तुम्ही उपाशी, भाजप तुपाशी', 'भारतीय जनतेचे पाकीटमार' असा उल्लेख; वातावरण तापले

नांदेड अन् मुंबईत भाजप विरोधी पोस्टर्स:'तुम्ही उपाशी, भाजप तुपाशी', 'भारतीय जनतेचे पाकीटमार' असा उल्लेख; वातावरण तापले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याची राजधानी मुंबई व नांदेडमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात पोस्टर्स लावण्यात आलेत. या पोस्टरवर भाजपचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला असून, त्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यात पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होवून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असा दावा केला जात आहे. त्यानुसार सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड व मुंबईत भाजपविरोधी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सद्वारे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या होरपळीवर भाष्य करण्यात आले आहे. विशेषतः यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला आहे.

 
 

या पोस्टरद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आली असून, शेतकऱ्यांची अवस्थाही फार बिकट झाली आहे, असा संदेश त्यातून देण्यात आला आहे. तुम्ही म्हणजे जनता उपाशी अन् भाजप तुपाशी असाही उल्लेख यापैकी एका पोस्टरवर आहे. अमरावती येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेच पोस्टर लावले होते. त्यामुळे नांदेड व मुंबईतही युवक काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लावले असावेत असा दावा केला जात आहे.

 
 

 

काय आहे पोस्टरवर?

मुंबई, नांदेड व अमरावती या तिन्ही ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर एकसारखेच आहेत. या पोस्टरवर भाजपचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुकानावर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीचा खिसा साफ करताना म्हणजे पाकीट मारताना दाखवण्यात आले आहे. हे सर्वकाही व्यंगचित्राच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे. एवढेच नाही तर गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीचा मुद्दाही यात अधोरेखित करण्यात आला आहे.

 
 

यासंबंधीच्या एका व्हायरल व्हिडिओतही महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. अन्य एका पोस्टरवर टाईम फॉर खर्चावर चर्चा म्हणजे ही खर्चावर चर्चा करण्याची वेळ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जीएसटी, सावकारी आदी मुद्यांवरही याद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

IMG-20240904-WA0422    WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM          WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)                            WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp