मनोज जरांगेंचे 17 तारखेपासून पुन्हा उपोषण:म्हणाले - देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पण मी मराठ्यांसाठी झुंजणार

मनोज जरांगेंचे 17 तारखेपासून पुन्हा उपोषण:म्हणाले - देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पण मी मराठ्यांसाठी झुंजणार

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी अचानक उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांनी 16 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून म्हणजे 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी ही मराठ्यांसाठी झुंज देण्याचा निर्धार केला आहे. माझी शहीद होण्याचीही तयारी आहे. त्यानुसार मी 17 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे, असे ते म्हणालेत.

मनोज जरांगे यांनी गत महिन्यात 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी मंगळवारी आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना अचानक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासून म्हणजे 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे.

मी मराठ्यांसाठी झुंजणार

मनोज जरांगे म्हणाले, मी मराठ्यांसाठी झुंजणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला संपवण्यासाठी झुंजा. मराठे मोठे न होण्यासाठी झुंजा. महाराष्ट्रातील सर्वच मराठा आमदारांना आमच्याविरोधात झुंजण्यास लावा. तुम्ही आमच्याविरोधात कितीही सापळे लावले, कट कारस्थान रचले, तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी शहीद होण्यास तयार आहे. तुम्हाला काय षडयंत्र करायचे आहेत ते करा.

मनोज जरांगे म्हणाले, माझा लढा समाजासाठी आहे. मला माझा समाज मोठा करायचा आहे. इतरांना त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे. आम्ही अंदाजानुसार 29 सप्टेंबर ही तारीख ठरवली होती. पण आता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासूनच उपोषण सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. सरकार सगेसोयरेची अंमलबजावणी केव्हा करणार? हैदराबाद, सातारा संस्थान व बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट केव्हा लागू करणार? मराठा आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? अशा विविध प्रश्नांची सरबत्तीही जरांगे यांनी यावेळी महायुती सरकारवर केली.

अब्दुल सत्तार, मुंडेंनी नुकतीच घेतली होती भेट

उल्लेखनीय बाब म्हणजे गत 2-3 दिवसांत आंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांच्यात नेमकी कोणती सल्लामसलत झाली हे समजले नाही. पण आता जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा करून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीच्या अडचणींत वाढ केली.

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM                WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM           WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)                          WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM

 
Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp