उलटी केल्यामुळे प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाचा खून; पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या
नाशिकमध्ये चिमुरड्याचा खून करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या बंटी-बबलीचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाने जेवल्यानंतर उलटी केल्याच्या रागातून प्रियकराने त्याला बेदम मारहाण केल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. महेश कुंभार (रा. पंचवटी, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वेदांश वीरभद्र काळे (वय 4, रा. बिबवेवाडी) असे खून केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
बिबवेवाडीत राहणारी पल्लवी काळे हिचा चार वर्षीय मुलगा वेदांश हा खाटेवरून खाली पडल्याचा बनाव करीत तिने कमला नेहरू हॉस्पिटल (कसबा पेठेत) दाखल केला होता. मात्र, उपचारादरम्यान 2 सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, उपनिरीक्षक शशांक जाधव, विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे, आदिती बहिरट यांनी संबंधित मुलाच्या आईकडे चौकशी केली. त्यावेळी तीन महिन्यांपासून ती बिबवेवाडीत राहत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिचा नाशिकमधील प्रियकर आरोपी महेश कुंभारशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. तीन महिन्यांपासून पल्लवी नाशिकमध्ये राहायला होती.
आरोपी महेशने केलेल्या मारहाणीत वेदांशचा मृत्यू झाल्याचे अहवालावरून उघडकीस आले. संबंधित गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. ही कामगिरी उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक अशोक येवले, उपनिरीक्षक विवेक सिसाळ, पोलीस अंमलदार विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे, विशाल जाधव, संजय आग्रे, अजय कामठे यांनी केली.
.jpeg)


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List