तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल होतील , सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा , आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानीटकर यांचे प्रतिपादन

तंत्रज्ञानाच्या  योग्य वापराने शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल होतील , सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा , आरोग्य विज्ञान  विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानीटकर यांचे प्रतिपादन

युपीआय मुळे तळागाळातील सामान्य व्यक्ती डिजिटल व्यवहार करू लागला आहे. त्यामुळे भारतात आर्थिक क्रांती घडून आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून असा आमुलाग्र बदल शिक्षण क्षेत्रात होणे गरजेचे आहे. असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट जन. डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल व पेडीस्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने "सिम्युलेशन आंतरराष्ट्रीय परिषदेचे" आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, पेडीस्टार इंडियाचे अध्यक्ष डॉ. विजयानंद जमलपुरी, आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, पिटर वायनस्टॉक, माईक शेफर्ड, सुषमा नांगिया, नीलिमा भोरे हे उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, ज्या लोकांपर्यत ज्ञान पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून पोहोचण्याची गरज आहे. रोबोटिक्स, एआय जरी आले तरी वैद्यकीय क्षेत्रात सिम्युलेशनचे महत्व कायम असणार आहे.

डॉ. सावजी म्हणाले, जगात ज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सामाजिक गरज ओळखून शिक्षण गतिमान असेल तरच त्याचा बदलत्या काळात उपयोग होऊ शकेल. सिम्युलेशनमुळे वैद्यकीय शिक्षणातील प्रवास हा सुखकर झाला आहे. आधुनिक काळात त्याची खूप गरज आहे.

डॉ. ललवाणी म्हणाले, पिडिस्टार ही ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था आहे. बालरोग आरोग्य सेवेमध्ये सिम्युलेशन आधारित शिक्षण पुढे नेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशाच्या विविध भागांमध्ये विविध कार्यशाळा, परिषदा आयोजित करून सिम्युलेशनच्या वापराला प्रोत्साहन देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

चार दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी भारताच्या बाहेरून २० व भारतभरातून ६० प्रशिक्षण देणारे तज्ञ उपस्थित आहेत. जगभरातून चारशे बालरोग तज्ञ, सिम्युलेश क्षेत्रात कार्यरत तज्ञ या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत.

सिम्युलेशन आधारित शिक्षण हे वर्गातील शिक्षण आणि वास्तविक जीवनातील वैद्यकीय अनुभव यांच्यातील पूल आहे. वैद्यकीय क्षेत्रात ते एक वरदान ठरेल आहे. रुग्नांना निर्माण होणाऱ्या जटिल समस्या या आधुनिक कॉम्प्युटर आधारित सिम्युलेटर व्दारा निर्माण करता येतात (संगणकीकृत पुतळ्यांवर). त्यामुळे क्रिटिकल केअर युनिटमध्ये किंवा इतर रुग्नाना उपचार देत असताना त्याचा खूप फायदा होतो. प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी या संगणकीकृत पुतळ्यांवर अनुभव मिळालेला असल्याने होणाऱ्या चुका टाळता येतात.

04 WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)    WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp