मला येडा समजू नका चाळीस वर्षे झालीत राजकारणात ; माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटलांचा महायुतीला इशारा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तूळात इच्छूक उमेदवारांच्या हालचालींनी चांगलाच वेग पकडल्याचे बघायला मिळत आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. इंदारपूर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार व विद्यमान आमदार दत्ता भारणे यांना उमेदवारी जवळपास जाहीर झाल्यासारखे दिसत आहे. यामुळे पक्षातील दुसरे ताकदीचे उमेदवार व ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यानी आपल्या मनातील असलेली खदखद व्यक्त केली आहे. राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
माझ्या बाबतीत उमेदवारी तिकीट हा कायमच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. जिथे, जिथे योग्य भूमिका घ्यायची गरज आहे, तिथे घेऊ. मला ही राजकारणात 40 वर्ष झाली आहेत. मलाही राज्यातली आराखडे कळतात. मला अडाणी समजू नका, असा टोला त्यांनी लगावला. त्यांचा हा टोला कुणाला होता, हे वेगळे सांगायची गरज नाही.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपल्या सगळ्यांचा पाठबळ बघितल्यानंतर 2024 च्या विधानसभेत परिवर्तन होईल. महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे मला माहित नाही. इंदापूर च्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा ही तालुक्यापूर्ती मर्यादित राहिली नाही. राजकीय वातावरणावर महाराष्ट्रात चर्चा आहे. इंदापूर तालुक्यात बदल होणार आहे, हे नागरिकांनी ठरवले आहे.
उद्याची निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न आहे. उद्याच्या आमदारकीच्या निकालापेक्षा दहा वर्षे काही नसताना सोबत राहिली, ते निष्ठावन्त सोबत आहेत. म्हणून आज वेगळी ताकद निर्माण झाली आहे. आज सगळ्यांचे फोन येत आहेत. याचा अर्थ काय घ्याचा तो घ्या. मी कुणाला होकार दिलेला नाही. जी चर्चा लोकसभेच्या वेळी झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी मैत्री आहे. त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
अपमान सहन करणार नाही
अजित पवार यांच्यावर निशाणा साधत हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रवादीची यात्रा आली ते जे बोलले हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप व्हायचे आहे. कुणाला कुठली जागा मिळायची हे बाकी आहे. अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितले. देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असे अजित पवार म्हणाले. तरीही, त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जाहीर काय केले. इंदापूरच्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नाही. हर्षवर्धन पाटील सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List