नवा पुतळा आघाडी सरकारकडून उभारला जावा, ही महाराजांची इच्छा असेल:सतेज पाटलांची टीका; सरकारने राजीनामा देण्याची मागणी
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र त्याचे खापर नेव्हीवर फोडून नेव्हीला बदनाम करू नका. चूक झाली असेल तर शासनाने माफी मागितली पाहिजे, असे म्हणत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी त्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी तसेच याचा इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील सरकार असे करते, हे खरेच दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत. पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही, हे आज दिसून येत असल्याचे देखील ते म्हणाले. केवळ निवडणुकीआधी अनावरण करण्यासाठीच अनुभव नसणाऱ्या लोकांना हे तर काम दिले गेले, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
आपटे नावाच्या व्यक्तीला हे काम देण्यासंदर्भात नेव्हीला कोणी सांगितले? कोणत्याही शास्त्रात न बसणारे नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केले गेले, असा आरोप देखील सतेज पाटील यांनी केला आहे. चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी. मात्र नेव्ही वर ढकलू नये, नेव्हीला बदनाम करू नका, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचे काम हे सरकार करत असल्याची घनाघाती टीका देखील सतेज पाटील यांनी केली आहे.
आघाडी सरकारकडूनच उभारा जावा, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल
पुन्हा उभारला जाणारा पुतळा हा महाविकास आघाडी सरकारकडूनच उभारा जावा, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल. आता ती आमची जबाबदारी असल्याचे देखील सतेज पाटील यांनी म्हटले आहे. महायुती सरकार हे महागळती सरकार आहे. राम मंदिर, विमानतळ, संदसद भवन या ठिकाणी गळतीच्या घटना घडल्या आहेत. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील पडला आहे. ही घटना संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List