नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन: दोन महिन्यापूर्वी अतिशय चुरशीने झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता ;हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन: दोन महिन्यापूर्वी  अतिशय चुरशीने झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता ;हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार वसंत चव्हाण यांचे यकृताच्या आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. मध्यरात्री खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने नांदेड जिल्ह्यावरच नाही तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसंत चव्हाण यांना गेल्या आठवड्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री अचानक त्यांची तब्येत प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा तातडीने हैदराबाद येथील किंग्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, हैदराबाद येथील या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेड मधून विजय मिळाला होता. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. नांदेडमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र असे असले तरी नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंत चव्हाण यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसकडे विजय खेचून आणला होता.

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले त्यावेळी वसंत चव्हाण देखील भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा होती. मात्र, ते काँग्रेस सोबत कायम राहिले. त्यामुळे पक्षाने त्यांना लोकसभेत उमेदवारी देत त्यांना थेट लोकसभेत पाठवले होते.

आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ विजय वडेट्टीवार

या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखातस हभागी आहोत.

काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला - नाना पटोले

काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे.

04

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)    WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp