प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे निदर्शने: 3 सप्टेंबर पासून आंदोलन तीव्र करणार; मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल, कर्मचारी आक्रमक
मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हामी दिली होती. प्रत्यक्षात उक्ती प्रमाणे कृती त्यांनी केली नाही. यामुळे एसटी कामगार रोष व्यक्त करत आहे. शनिवारी विभागीय कार्यासमोर निदर्शने आंदोलन केले. तसेच ३ सप्टेंबर पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या नेतृत्वात ९ व १० जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन शिंदे सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री शिंदे यांनी दिली होती. त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. २० ऑगस्टला बैठकी संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाला पत्र आले होते. ऐनवेळी बैठक रद्द करण्यात आली. यामुळे एसटी कामगारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी एसटी कामगारांनी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले.
या आहेत मागण्या
शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना वेतन देण्यात यावे, महागाई भत्ता मिळावा, २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने अदा करावी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कमागारांना घर भाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढे मिळावी, तशी करारात तरतूद केली होती. २०१६ ते २०२० या कालावधीतील करापोटी ४८४९ कोटींची तरतूद जाहीर केली होती. त्याची पूर्ण पूर्तता केलेली नाही.
शिल्लक रक्कम वाटप करावी, घरभाडे दर ८,१६, २४ टक्के लागू केला होता. प्रत्यक्षात ७, १४ आणि २१ टक्के, वेतन वाढ दर ३ टक्क्याऐवजी २ टक्केच करून एकतर्फी निर्णय घेऊन कामगार कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. त्यामुळे माहे एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ या ५७ महिन्यांच्या कालावधीची घर भाडे भत्त्याची थकबाकी व एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या ५८ महिन्यांच्या कालावधीच्या वार्षिक वेतन वाढीची थकबाकी एसटी कामगारांना देण्यात यावी.
नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे पाच हजार, चार हजार, अडीच हजाराची वाढ करण्यात आली होती. परंतु अशी वाढ देताना सेवा जेष्ठ कामगारांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेले आहे. त्या विसंगती दूर करण्यासाठी सर्वच कामगारांना सरसकट ५ हजारांची वाढ लागू करण्यात यावी, यासाठी एसटी कामगार एकत्रित येऊन आंदोलन करत आहेत.


.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List