वारकरी शिक्षण संस्थेतील धक्कादायक घटना ; आश्रमातील महाराजांनी आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला पाय दाबायला बोलावले आणि केला बलात्कार

 वारकरी शिक्षण संस्थेतील धक्कादायक घटना ; आश्रमातील महाराजांनी आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला पाय दाबायला बोलावले आणि केला बलात्कार

राज्यात बदलापूर येथील प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता कन्नड तालुक्यातील हतनूर येथील माऊली वारकरी कन्या आश्रमात दादा महाराज अकोलकर या 60 वर्षीय संस्थाचालक बाबाने आपल्याच आश्रमात शिक्षण घेणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केला. तर दुसऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिच्यावर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना (दि.24) ला शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात या महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांकडुन त्याला अटक करण्यात आली आहे.

कन्नड तालुक्यातील हतनूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा (वय- 60) यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्थांचा आश्रम असून येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या 15 मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात. याच ठिकाणी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय जैतापूर इयत्ता 7 वित शिक्षण घेणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेतात.

सदर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आम्ही दादा महाराज अकोलकर यांचे माऊली वारकरी कन्या आश्रम येथे राहते. आश्रमातुन आम्ही सर्व मुली शाळेच्या कुझर गाडीने शाळेत ये-जा करतो शाळेची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी चार पर्यंत असते. माझ्यासोबत कन्या आश्रम मध्ये इ. 1 ली ते 15 वी पर्यंतच्या 15 मुली आहेत. त्यासुध्दा माझ्याच शाळेत शिकतात. आमच्या कन्या शाळा आश्रमाचे सगळे काम दादा महाराज अकोलकर पाहतात. आम्ही सर्व मुली त्यांना बाब म्हणतो. आश्रमात आम्ही रोज पहाटे पाच वाजता उठतो.

अंघोळ करुन पुजा करुन गितापाठ करतो. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बाबा आम्हा सर्व मुलींचे हरिपाठ करायला लावायचे त्यांनंतर आम्ही मुली स्वयंपाक करुन जेवण करुन रात्री साईनऊ दहा वाजता झोपायचो. झोपण्याआधी बाबा आम्हा मुलींकडून त्यांचे हातपाय दाबुन घेतात. बाबांनी या आधीपण माझ्याकडुन मी आश्रमात गेल्यापासुन दररोज रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी माझ्याकडून हातपाय दाबून घेत होते.

20 ऑगस्ट मंगळवार रात्री साडेनऊ दहा वाजता आश्रमातील शेडमध्ये आम्ही सर्व मुली झोपलेल्या असतांना रात्रीच्या बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास बाबा (दादा महाराज अकोलकर) हे माझ्याजवळ आले त्यांनी मला हात लावुन हलवुन उठवले आणि माझे पाय दावायला चल असे म्हणून मला झोपेतून उठवून आम्ही मुली झोपत असलेल्या शेडला लागुन असलेल्या बाबांच्या शेडमध्ये घेवुन गेले, ते पलंगावर झोपले त्यांनी मला त्यांचे पाय दाबायला लावले. मी त्यांचे पलंगावर बसून त्यांचे पाय दाबत असतांना त्यांनी बळजबरीकरून बलात्कार केला. व नंतर जाऊन झोपून रहा कोणाला सांगू नको नाहीतर मी तुला शिकवणार नाही अशी धमकी दिली.

त्यानंतर माझ्या बाजूलाच झोपलेल्या दुसऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्यांनीला पाय दाबण्यासाठी घेऊन गेले तिचा विनयभंग करून ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बाहेर कुणीतरी आल्याचा आवाज आल्याने बाबा उठून बाहेर गेल्याने ती तेथून पळून आली. आम्ही आमच्या शाळेच्या मुंगे मॅडम यांच्या फोनवरुन आईवडीलांना अधूनमधून फोन करायचो, पण त्या बुधवारी व गुरूवारी सुट्टीवर होत्या आमच्या दोघींकडे फोन नसल्यामुळे आम्हाला आमच्या आईवडीलांना घडलेल्या गोष्टीबद्दल सांगता आले नाही.

शुक्रवारी मुंगे मॅडम शाळेत आल्यावर मी माझ्या आईच्या नंबरवर फोन करुन बाबानी आमच्यासोबत जे केलं ते सांगितलं म्हणून दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी माझे आईवडील, दुसऱ्या मुलीचे आजोबा आश्रमात आले त्यांना आमच्यासोबत बाबानी केलेल्या प्रकाराबाबत सविस्तर सांगितले. अखेर कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठून दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा विरुद्ध यांच्याविरुद्ध दादा महाराज अकोलकर याच्या विरुद्ध कलम 64 (2) (F) (1),65(1),74,75 (1) (ii), 351 (2), बीएनएस 2023 सह कलम 4,6,8,10,12 पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार करत आहेत.

वारकरी समूहाची प्रतिमा मलिन

वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार विनयभंग केल्याचा तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. एका वारकरी शिक्षण संस्था चालकाकडून असा प्रकार घडल्याने वारकरी समूहाची प्रतिमा मलिन करण्याचे काम आरोपीने केले असून यापूर्वी असे प्रकार केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

04

 

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM

 

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM

 

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)

 

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp