मनोज जरांगेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर!:दिल्ली, पंजाब, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात परिवर्तनासाठी आखली जातेय रणनिती

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात २८८ जागेवर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत आहे. मात्र, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहेरा सध्या उपलब्ध नाही. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना सोबत घेऊन ते महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी आपच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाची थेट ऑफर जरांगे यांना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.
समाजसेवक अण्णा हजारे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनी माहितीचा अधिकार, लोकपाल बिलासह विविध मागण्यांसाठी जंतर मंतरवर आंदोलन केले होते. देशभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात निवडणूक लढली. काँग्रेसची अनेक वर्षांची एक हाती सत्ता त्यांनी उखडून टाकली. तर भाजपलाही दारूण पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या टर्म मध्येही त्यांनी भाजप व काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. पंजाब राज्यातही बहुमताने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मधील पटेल आंदोलनाला साथ देऊन त्याचे मतात परिवर्तन करण्यात चांगले यश मिळवले. आता महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर त्यांनी सर्वप्रथम फोकस केला आहे. त्यांच्या मोर्चेत होणारी गर्दी, त्यांच्या मागण्या व सरकारची विरोधी भूमिका, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आप च्या वतीने विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.
प्राथमिक चर्चा
आम आदमी पार्टीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके म्हणाले की, आम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटलो व विधानसभा निवडणूक संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला. हि प्राथमिक चर्चा होती. केंद्रिय समितीचे प्रमुख येतील व पुन्हा त्यांच्याशी बोलतील. मात्र, योग्य निर्णय जरांगे पाटील यांनीच घ्यायचा आहे. तसेच आम्ही सर्व जागा लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला एक सक्षम राजकीय पर्याय आम्ही देत आहोत. त्याला जरांगे पाटील यांची साथ मिळाली तर परिवर्तनाची लाट येईल.

.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List