बदलापूरच्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार; पालकांचा संताप, शाळेसमोर सर्व पालकांनी केली गर्दी , लोकांनी मुंबईतील लोकलही अडवले, सरकार जागेवर आहे काय ? विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल .
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनांनी रेल्वे स्थानकावर येऊन ट्रकवर उतरले आहेत. त्यांनी लोकल अडवली आहे.
बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार- चित्रा वाघ

बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते, असे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गृहखाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल, तशा सूचना पोलीस खात्याला दिल्या गेल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार…
समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चालली असून काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवावे तसेच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावे, अशी माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे.
सरकार झोपले आहे का- वडेट्टीवार
महिला अत्याचाराच्या घटनेत जी वाढ होत आहे त्यावर सरकार काही बोलत नाही. सरकार झोपले आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
कडक कारवाई करावी- हरभजन सिंग
बदलापूरमधील या घटनेवर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली. आम्हा लोकांची काय चूक आहे... मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की, त्यांनी अशा मानसिकतेच्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करावी.
अशा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर व्हावा - अविनाश जाधव
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक दिवसांपासून घटनेचा पाठपुरावा करत होत्या. जे घडले ते खूपच वाईट होते. अशा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकले पाहिजे. लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
भरचौकात फाशी द्या - नवनीत राणा
नवनीत राणा म्हणाल्या की, बदलापूरमध्ये शाळेत जे घडले त्या राक्षसाला भर चौकात फाशी द्यायला हवी आहे. आशा लोकांना काद्याची भीती राहिली नाही. मनाला खूप वेदना होत आहे, असे कृत्य करणाऱ्यांना कायद्याची भीती असायला हवी, त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे राणांनी म्हटले आहे.
आरोपी जर भेटले तर त्यांना ठेचायचला सुरवात आमच्यापासून होईल- संजय शिरसाट
बदलापूरमध्ये जी अत्याचाराची घटना घटली यावर बोलताना शिवसेना प्रवक्ते म्हणाले की, या नराधमांना डायरेक्ट मारायची वेळ आली आहे. या गोष्टीवर राजकारण करु नये, सर्वांनी या एकत्र येत याचा निषेध करावा. आशा प्रकरणातील आरोपी जर भेटले तर त्यांना ठेचायचला सुरवात आमच्यापासून होईल असे म्हणत या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल.
आरोपीला 2 तासात अटक - गृहमंत्री
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहे. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहे.
आरोपीला कठोर शिक्षा होईल- सीएम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेकी, मी पोलिस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल.
नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या- सुळे

सुप्रिया सुळे एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाल्या की, अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. यामध्ये मला राजकारण आणायचे नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असे वागण्याची भिती वाटली पाहिजे, कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे, हात लावणे तर दूरची गोष्ट पण पाहताना देखील दहा वेळा विचार केला पाहिजे.
नेमके प्रकरण काय?
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास लावले. असा आरोप पालकांनी केला होता. यावरून पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलिस ठाण्यात दोन नवीन पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रकरणी शाळेने माफीनामादेखील दिला आहे. या प्रकरणी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना,शाळा बस चालक देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.
नागरिकांनी लोकल अडवली
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनांनी रेल्वे स्थानकावर येऊन ट्रकवर उतरले आहेत. त्यांनी लोकल अडवली आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलिस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्याप्रकरणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचे निलंबन केले आहे.


.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List