पी.एचडी. च्या विद्यार्थ्याकडून संशोधक मार्गदर्शकाने मागितली पाच लाखाची लाच ; गाईडसह चौघांवर गुन्हा दाखल तिघांना पोलिसांनी केली अटक

अँटी करप्शन ब्युरो ने दिलेला सविस्तर अहवाल वाचा

छ. संभाजीनगर (औरंगाबाद ):-
          डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधक मार्गदर्शक असलेल्या नावखंडा महिला महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि पीएचडी मार्गदर्शक असलेल्या मॅडमनी आपल्याच पीएचडी च्या विद्यार्थ्याकडून पाच लाखाची मागणी केली आणि त्यातील 50 हजार रुपये लाच स्वीकारताना  त्यांच्या मुलासह तिघांना अटक करण्यात आली याबाबतचा सविस्तर वृत्तांत लाचलुचपक प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेला आहे संबंधित विद्यार्थ्याला महाज्योतीची फेलोशिप मिळालेली आहे, महिना 50 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीतून आपल्याला दहा हजार रुपये प्रति महिना देण्यात यावे अशी मागणी गाईडने विद्यार्थ्याकडे केली होती त्याबाबत संबंधित विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आणि तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दिनांक 19 ऑगस्ट रोजी मिल कॉर्नर येथे सापळा रचून संबंधित गाईडच्या मुलाला आणि त्यांच्या साथीदाराला अटक करण्यात आलेली आहे बेगमपुरा पोलीस येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या बातमीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

 

अँटी करप्शन ब्युरो ने दिलेला कारवाई अहवाल खालील प्रमाणे आहे

*आदरणीय सर** 
*यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
 दि. 19/08/2024

▶️ युनिट - जालना 

▶️ तक्रारदार-  पुरुष, वय- 34 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक -
1) श्रीमती डा‌‌ॅ. एराज सिद्दीकी, संशोधक मार्गदर्शक (phd गाईड), ग्रंथपाल, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर ( वर्ग-1 )
2) शेख उमर शेख गणी वय 52 वर्ष व्यवसाय नोकरी ग्रंथालय परिचारक डॉ रफिक झकेरिया महिला महाविद्यालय नवखंडा छत्रपती संभाजीनगर ( वर्ग- 4 )
3) डॉ. सिद्दीकी मो. फैसोद्दीन ऊर्फ समीर मो. रियाजुद्दिन वय 36 वर्ष, व्यवसाय- सहाय्यक संचालक, ERS रिसर्च अँड टेक्नोलॉजी pvt. LTD, मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर  रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर (खाजगी इसम) 
4) सिद्दीकी फराज मो. रियाजुद्दिन वय 31 वर्ष, व्यवसाय- संचालक, ERS रिसर्च अँड टेक्नोलॉजी pvt. LTD, मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर (खाजगी इसम)

▶️ लाच मागणी रक्कम - 
    नोव्हे 2022 ते नोव्हे 2026 पावेतो दरमहा 10,000/- रू प्रमाणे एकुण 5,00,000/- रु ची लाच मागणी करून त्यातील 50,000/- रुपये रक्कम स्विकारली. 

▶️ लाच पडताळणी दिनांक -  
     24/07/2024
     25/07/2024
     27/07/2024
     29/07/2024

▶️ लाच स्वीकारली दिनांक -
19/08/2024

▶️ स्विकारली लाच रक्कम - 50,000/- रुपये 
 
▶️ कारण- यातील फिर्यादी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयामध्ये विद्यावाचस्पती PHD चे संशोधन करीत आहे. त्यांना विद्यापीठाकडून संशोधनासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणुन आलोसे क्र.1 श्रीमती डॉ.एराज सिद्दीकी मॅडम, ग्रंथपाल, डॉ रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा, छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारदार यांना महाराष्ट्र शासनाचे म.ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांचेकडून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)  म्हणुन दरमहा 50,400 रूपये मिळत आहेत. सदर फेलोशिप तक्रारदार यांना मिळण्यासाठी तक्रारदार यांना tyanche प्रोग्रेस रिपोर्ट, स्वयं घोषणा पत्र, हजरी पत्रक, HRA प्रमाणपत्र, तिमाही सहामाही प्रोग्रेस रिपोर्ट यावर आलोसे क्रं 1 यांची सही घेऊन सदर कागदपत्रे विद्यापीठात सादर करावे लागतात. सदर कागदपत्रा वर सह्या करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे रीपोर्ट पॉझिटिव्ह देण्यासाठी आलोसे क्र.1 डॉ. सिद्दीकी या तक्रारदार यांचेकडे दरमहा 10, 000 रुपये प्रमाणे लाचेची मागणी करीत आहे, अशी तक्रारदार यांनी तक्रार दिली आहे.
सदर तक्रारीच्या अनुशंगाने दि.24.07.2024 रोजी तक्रारदार यांना आलोसे क्र. 2 यांनी तक्रारदार यांचे कागदपत्रावर आलोसे क्र 1 यांची सही घेऊन देण्यासाठी 25,000/- रुपयाची लाचमागणी केली. त्यानंतर दि. 27.07.2024 रोजी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना त्यांचा मुलगा आरोपी क्र.3 यास भेटण्यासाठी सांगितले. त्यानंतर दि. 29.07.2024 रोजी आरोपी क्र. 3 यांनी आलोसे क्र. 1 यांचे सांगण्यावरून तक्रारदार यास तुमचे सगळे रिपोर्टवर आलोसे क्र 1 यांचे  सह्या करुन देण्यासाठी, तसेच RAC रिपोर्ट पाॅझीटीव्ह देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे त्यांना मिळणारे फेलोशीप मधुन नोव्हे 2022 ते नोव्हे 2026 पावेतो दरमहा 10,000/- रू प्रमाणे एकुण 5,00,000/- रु ची लाच मागणी करून त्यातील 50,000/- रुपये स्विकारन्याचे  मान्य केले. त्यावेळी तक्रारदार यांनी आलोसे क्र  1 यांना फोन केला त्यावेळी आलोसे क्र 1 यांनी आरोपी क्र. 3 सांगतील त्याप्रमाणे रक्कम देण्यास सांगून लाच मागणी केली आहे. त्या अनुषंगाने आज दि.19.08.2024 रोजी आलोसे क्र. 1 यांनी लाचेची रक्कम आरोपी क्र. 4 यांचेकडे देण्यास सागितले. त्यानंतर तक्रारदार यांचे कडून आज दि. 19.08.2024 रोजी ERS कोचिंग क्लासेस येथे आरोपी क्र. 4 यांनी लाचेची रक्कम 50000 रुपये स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. 
       आरोपी क्रं 2, 3 व 4 यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

▶️ *सापळा अधिकारी* -
          शंकर म.मुटेकर 
पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी ला.प्र.वि. जालना. मो.नं. 9767108455

▶️ *मार्गदर्शक अधिकारी* -
    श्री संदीप आटोळे* 
    पोलीस अधीक्षक, 
    ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर 
    मो.नं.9923023361

 * श्री. मुकुंद आघाव 
  अपर पोलीस अधीक्षक,
  ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर 
मो.नं. 9881460104

▶️  *सापळा पथक*- 
गजानन घायवत, गजानन खरात, शिवाजी जमधडे, गणेश चेकें, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, जावेद शेख, भालचंद्र बिनोरकर, विठ्ठल कापसे, कुंटे मॅडम 

================
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

*अँन्टी करप्शन ब्युरो,  जालना 
dyspacbjalana@gmail.com

@ दुरध्वनी क्रं. 02482-220252*

*@ टोल फ्रि क्रं. 1064WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)  04 WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PMWhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp