संभाजी भिडे ही व्यक्ती प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची आहे का?: हल्ली कसेही प्रश्न विचारता, असे म्हणत भर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेत्याने व्यक्त केला संताप
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी या प्रकरणी रविवारी मराठ्यांना आरक्षणाचा नाद सोडून उभा देश चालवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. याविषयी पत्रकारांनी सोमवारी शरद पवार यांना छेडले असता ते चांगलेच संतापलेत. संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसे आहेत का? असा संतप्त सूर आळवून त्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
संभाजी भिडे यांनी रविवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मराठा समाजाला आरक्षणाचा आग्रह न धरण्याचा सल्ला दिला होता. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आमच्या सांगवी गावात एक ट्रेनिंग कॅम्प आहे. त्यात वाघ- सिंहांनी प्रवेश मागावा का? एखाद्या ग्लायडिंग सेंटरमध्ये गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्वीमिंग क्लबमध्ये माशाने प्रवेश मागावा का? मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षण कुठून काढलंय? असा सवाल त्यांनी याविषयी उपस्थित केला होता.
सिंहाने संबंध जंगल सांभाळायचे असते. माशांनी स्वीमिंग क्लबमध्ये न जाता पृथ्वीवरील संपूर्ण समुद्रात फिरायचे असते. गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जाण्याचा आग्रह धरू नये. त्यानुसार मराठा जात हा संबंध देशाचा संसार चालवणारी आहे. हे ज्या दिवशी मराठ्यांच्या लक्षात येईल, त्या दिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून निघेल. हे त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाविषयी पत्रकारांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छेडले असता त्यांनी एका वाक्यातच हा विषय संपवला. तसेच पत्रकारांवरच रागावत पत्रकार परिषदेतून उठून गेले.
हल्ली काहीही कसेही प्रश्न विचारता
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचे नाही असे म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारता. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक- तमूक...., असे म्हणतच शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया आवरती घेतली आणि पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.
अजित पवारांच्या मनात काय? माहिती नाही
याच पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अजित पवार यांच्या बारामतीमधून निवडणूक न लढवण्याच्या मुद्यावरही आपली संक्षीप्त प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक किंवा राजकीय जिवनात निवडणूक लढलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्यानुसार जिथे अनुकूल वातावरण असते, तिथे त्यानुसार निर्णय घेतले जातात. पण आता यांच्या (अजित पवार) मनात नक्की काय सुरू आहे हे मला माहिती नाही, असे शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा...
दादांच्या मनात काय? मला माहिती नाही:अजितदादांच्या 'बारामती' न लढण्याच्या विधानावर पवारांची प्रतिक्रिया; PM मोदींनाही हाणला टोला
पुणे - अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यात आपल्याला रस नसल्याचे सूतोवाच केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू असताना शरद पवार यांनीही अजित पवारांच्या मनात काय सुरू आहे हे आपल्याला ठावूक नसल्याचे सांगत यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
सार्वजनिक जिवनात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन, वन इलेक्शनच्या नाऱ्याचीही खिल्ली उडवली. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसल्याचे ते म्हणालेत.


.jpeg)
.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List