मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
छ. संभाजीनगर (औरंगाबाद) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश जून 2024 पासून चालु आहेत. परंतू कुठे अधिकचा पाऊस तर कुठे दुष्काळी वातावरण आणि विविध अडचणींचा विचार करून दोन वेळा प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ करून 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून नोकरदार, कर्मचारी, गृहीणी आणि नियमित कोर्सेस चालु असताना इतर कोर्सेस दुरस्थ माध्यमातून शिकण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. यावर्षी जून पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी प्रवेशाची मुदत संपल्यानंतरही विद्यार्थी व अभ्यासकेंद्राच्या विविध अडचणींचा विचार करून 15 जुलै व 1 ऑगस्ट 2024 अशी दोनदा मुदत वाढ देण्यात आली होती. आता पून्हा एकदा प्रवेशाची विनाविलंब शुल्क 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या नोंदणी कक्षाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृषी शिक्षणक्रम, सेवांतर्गत बी.एड. व विशेष बी.एड. वगळळता इतर सर्व शिक्षणक्रमासाठी 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारिख आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेत आपले प्रवेश अर्ज पूर्ण करून घ्यावेत असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव दिलिप भरड, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रो. डॉ. प्रकाश देशमुख, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) विभागीय केंद्राचे संचालक डॉ. रमेश शेकोकार यांनी केले आहे.


1.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List