एका महीन्यात आगीच्या दुसऱ्या घटनेने हादरले शहर, तीन वर्षांची चिमुकली दगावली...?

एका महीन्यात आगीच्या दोन घटना, 3 एप्रिलला छावणीत आगीची घटना घडली होती त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता आज 3 मे आहे एका महीन्यात दोन घटना, तेच अरुंद रस्ते, अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचावकार्यात बाधा येत होती, यामुळे स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात प्रयत्न केल्याने काही लोकांचा जीव वाचला.... परिसरातील विजपुरवठा बंद करून केले बचावकार्य ... घटनास्थळी डिसिपि नवनीत कावत यांनी भेट दिली.

                          आज रात्री 8 ते 8.30 वाजेच्या दरम्यान किराडपूरा, रोशन मस्जिदच्या पाच फुटांच्या गल्लीतील घरात प्रत्यक्षदर्शींना घरेलू गॅस सिलिंडर विस्फोटाचा आवाज आला. या आवाजामुळे परिसरातील लोकांनी त्या घराकडे धाव घेतली. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी रेती, पाण्याचा मारा केला. आग आटोक्यात येत नव्हती. काही लोकांना घराबाहेर काढले. भंगार विक्रेता शेख रिझवान पठाण, वय 32, जखमी यांचे हे घर आहे या घरात दोन कुटुंबे राहतात. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी शंभर ते दोनशे फुट पाईप घेऊन जावे लागले. अरुंद रस्ता असल्याने बचावकार्यात बाधा येत होती. शेजा-यांनी काही लोकांना घराबाहेर काढले. रिझवान खान बचावकार्य करत असताना दोन्ही हात जळाले. वेळेवर एम्बूलन्स मिळाले नसल्याने पायी जात किराडपूरा स्टाफ पर्यंत आणले. अगोदर जखमींना दुवा फाऊंडेशनच्या एम्बूलन्सने जखमींना घाटीत दाखल केले. एम्बूलन्स उपलब्ध झाली नसल्याने रिझवानला ऑटो मध्ये बसवून घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे व जिन्सी पोलिस व पोलीस कर्मचारी, मनपाचे बचाव पथक कार्यरत होते.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितले एका तीन वर्षांच्या मुलीची या घटनेत मृत्यू झाल्याचे सांगितले. पाच जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले चौकशी केल्यानंतर आगीचे कारण समोर येईल या घटनेत कीती लोकांचा मृत्यू झाला याची त्यांनी पुष्टी केली नाही. यावेळी माजी नगरसेवक अफसरखान, हाजी इसाक खान, जमील अहमद खान व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींमध्ये रिझवान सत्तारखान पठाण, वय 50, राहणार किराडपूरा, औरंगाबाद, 20 टक्के बर्न, फैजान रिझवान पठाण, वय 13, एक टक्के बर्न, रेहान चांद शेख, वय 16, दहा टक्के बर्न,सध्या रुग्णालयात, जिशान शेख, वय 17, 40 टक्के बर्न, आदील शेख, वय दहा, एक टक्के बर्न सदफ इरफान शेख, वय 3 मयत झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. जखमींवर वार्ड 22 आणि 23 मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने शहर हादरले हळहळ व्यक्त होत आहे 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp