शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ( घाटी ) च्या अपघात विभागावरील खोलीला लागली आग
गाद्या आणि काही कागदपत्रे जळाली
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) :-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ( घाटी) अपघात विभागाच्या वरील रूमला रविवारी ( दि. २१) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या, पोलीस प्रशासन, घाटीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या आगीमुळे घाटीत उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक यांना हानी पोहचली नाही. परंतु, रूममधील गाद्या, कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जळाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अपघात विभागाच्या वरती असलेल्या रूम नंबर ९ मध्ये रविवारी ( दि.२१) रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. रस्त्यावर असलेल्या काही नातेवाईकांना या रूमच्या खिडकीतून आग स्पस्ट दिसत होती. त्यांनी तत्काळ ही बाब सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. सुरक्षा रक्षक, उपस्थितांनी रूमचा दरवाजा तोडल्यानंतर रूममधील सामानाला आग लागल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सिराज बेग, छावणीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे, मुक्तार खान उर्फ बाबुभाई यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयात आग लागल्याचे समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे ३० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. शॉटसर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शॉट सर्किटमुळे आग लागली असावी
वसतीगृहातील खोली क्रमांक ९ ला बहुतेक शार्टसर्कीटमुळे आग लागली असावी. माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुममधील काही कागदपत्रे जळाली आहेत. सर्जरी विभागाच्या एका निवासी डॅाक्टरची ती खोली आहे व सदरील डॅाक्टर तेथेच अपघात विभागात ड्युटीवर होते.
डॉ. शिवाजी सुक्रे (अधिष्ठाता)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List