मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालया कडे विविध तीन  पर्याय उपलब्ध- राजेंद्र दाते पाटील

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालया कडे विविध तीन  पर्याय उपलब्ध- राजेंद्र दाते पाटील

प्रतिनिधी (मुंबई)- मराठा आरक्षण विषयावरील क्युरेटिव्ह पीटिशन प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालावर मराठा समाजाचे आणि आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे.एकंदरीत निकाल कसा येऊ शकतो ? असा महत्वाचा सवाल जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांना केला असता त्यांनी अत्यंत सविस्तर कायदेशीर बाबीवर भाष्य करताना सर्वच शक्यता स्पष्ट करतांना नमुद केले की, साधारणतः सर्वोच्च न्यायालय कडे साधारणतः विविध तीन पर्याय उपलब्ध असुन त्यावर निकाल येण्याची शक्यता निर्माण झालेली असुन त्यात पहिली शक्यता अशी असेल की,मराठा आरक्षणच्या क्युरेटिव्ह पीटीशन वर तीन प्रकारे निकाल हाती येण्याची शक्यता असुन त्यात पहिली  शक्यता ही आहे की,क्युरेटिव्ह पीटीशन  फेटाळली जाऊ शकते आणि असे काही झाल्यास सर्वोच्च न्यायालया कडून मराठा आरक्षण मिळण्याची शक्यता संपेल व मग अशा परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा वाढवून संसदे मध्ये घटना दुरुस्तीचा पर्याय केंद्र शासनाला सर्वच राजकीय पक्षांच्या मदतीने निवडावा लागणार असल्याची महत्वपूर्ण बाब जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी लक्षात आणुन दिली आहे.

      या बाबत इतर काही पर्याय आहेत काय असे विचारलेअसता ते म्हणाले की,क्युरेटिव्ह याचीका मध्ये सर्वोच्च न्यायालय नोटीस काढू शकते.याचा अर्थ या प्रकरणा तील प्रतिवादी असणाऱ्या जयश्री लक्ष्मणराव पाटील यांची मराठा आरक्षणास विरोध असेलल्या बाबत एक याचिका दाखल केलेली असुन या बाबत " तुमची भुमिका सादर करा असे " असे निर्देश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते.तर या प्रकरणात तिसरी शक्यता या प्रकरणात अशी आहे की, सर्वोच्च न्यायालय प्रत्यक्ष सुनावणी घेऊ शकते आणि या  सुनावणी साठी पुढील तारीख देण्याची शक्यता सुद्धा जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी वर्तवली असुन अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली तर अधिकचे न्याय निवाडे सादरीकरण करून स्पष्ट भुमिका मांडता येणार असल्यामुळे न्याय पुर्ण बाबी हाती येऊ शकतील.
        पुढे त्यांना प्रश्न विचारला की,असे काही झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पुढे काय होईल ? असे विचारले असता जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील म्हणाले की,मराठा आरक्षणाच्या सुनावणी साठी नोटीस काढली किंवा खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याचा स्थिती निर्माण झाल्यास न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे एक निश्चित असे न्याय पुर्वक पाऊल ठरणार आहे.जर क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यास पुढे काय ?असे म्हणताच ते म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यास महाराष्ट्र शासनाला राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने मराठा समाज हा सामाजीक आणि शैक्षणीक दृष्टया मागास असल्याची शिफारस प्राप्त करून घ्यावी लागेल, मराठा आरक्षणासाठी पुन्हा नव्याने मागासपण सिध्द करावे लागणार असल्याची बाब जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नमूद केली व प्रश्न उपस्थित केला की,वरील प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस जरी केली तरी इंद्रा सहानी प्रकरणातील ५०% आरक्षणाची मर्यादा परत आडवी येणारच आहे.सर्वोच्च न्यायालया च्या घटनापीठाने ई.डब्लू.एस. १० % आर्थिक कमकुवत घटकास दिलेले आरक्षण हे आरक्षणाची मर्यादा वाढवणारे नसुन हे आरक्षण कुठल्याही जातीच्या निकषावर नसुन आर्थिक कमकुवतपणा व वार्षिक आठ लाखाच्या आतील उत्पन्न असलेला व्यक्ती - समूहास ज्याला कुठलेही आरक्षण नाही अशा व्यक्ती- समुहास या निर्धारीत केलेल्या निकषावर दिलेले आरक्षण आहे.
      मराठा समाजाचे सामाजीक व शैक्षणिक मागासपण भारतीय राज्य घटनेतील ३४० व्या परिच्छेदा नुसार स्थापना असेलल्या आयोगाची शिफारस प्राप्त करून घेतल्यावर आणि रितसर मंजुरी घेतल्यावरच आरक्षण कायदा करून आरक्षण देता येईल परंतु त्यात सुध्दा कायदेशीर व घटनात्मक पेच पुढे आडवा येणार आहे.
मुळात घटना दुरूस्ती हा विचार महाराष्ट्र राज्य शासन करीत असेल तर घटना दुरुस्ती करण्याचा स्पष्ट अधिकार भारतीय राज्य घटनेतील परिच्छेद ३६८ नुसार फक्त लोकसभेस म्हणजे केंद्र शासनास आहे.म्हणुन राज्य शासन घटना दुरुस्ती किंवा आरक्षण मर्यादेत वाढ करने याचा विचार सुद्धा करू शकत नाही असे स्पष्ट व घटनात्मक असे परखड मत जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले आहे.WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM(1) WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp