मराठ्यांविरोधात सरकारचे षडयंत्र:मराठा तरुणांवर खोटे गुन्हे; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप, भुजबळांवर पुन्हा आक्रमक
मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही असे दोन ते तिन जणांनी ठरवले आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्रण रचले जात असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारचे शिष्टमंडळ उद्या भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली. भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच जवळच्याच कुणीतरी फोडले असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी ओबीसी नेते प्रयत्न करत असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
शांततेत आंदोलन सुरु असताना त्यांना उचकवण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याचे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यासाठी पुरवणी याद्या तयार केल्या जात आहे. यात चार ते पाच हजार मराठ्यांना अडकवण्याचा कट असल्याचेही जरांगे म्हणाले. याकडे सरकार लक्ष देत नसेल तर याकडे मराठा नेत्यांनी तरी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, मराठा समाज खचणार नाही, असा दावा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाविरोधातला डाव मराठा नेत्यांनी हाणून पाडावा असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीड, नांदेडसह महाराष्ट्रातील एसपींवर दबाव आणला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आम्ही गुन्हे दाखल होण्याला घाबरत नाही
खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे, हे महाराष्ट्रातील मराठ्यांना लक्ष्यात आले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मात्र, आम्ही 54 टक्के आहोत, आम्ही घाबरणार नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजातील घराघरातील नागरिकांनी आता मागे न हटण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आम्ही गुन्हे दाखल होण्याला घाबरत नाही, कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
बीडच्या पोलिस अधीक्षकांवर दबाव
खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी बीडच्या पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ हे स्वत: एसपींकडे जाऊन बसले होते. त्यांनी स्वत: यात नावांची यादी करत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्या विरोधात मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
मराठा नेत्यांनो, समोर या
मराठा समाजातील नेत्यांनी मराठा तरुणांसाठी पुढे येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी पुढे यावे, नसता तुम्ही आमच्यामुळेच नेते झाले आहात, हे लक्ष्यात ठेवा, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील नेते आता जर समाजासाठी पुढे आले नाही, तर त्यांचे काय करायचे, हे मराठा समाज ठरवणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ओबीसी-मराठा संघर्ष होणार नाही
ओबीसी समाजाच्या हे लक्ष्यात आले आहे की, मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण समाजाला मिळायला हवे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होणार नाही, असा दावा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. ओबीसी समाज मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचेही मनोज जरांगे पाटिल यांनी म्हटले आहे. आपल्यातील आरक्षण हे मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण असल्याचेही ओबीसी समाजाच्या लक्ष्यात आले असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List