आंदोलनाला लागलेले हिंसक वळण महागात पडणार:आरोपींकडून 11 कोटी रुपये वसूल करणार

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण महागात पडणार:आरोपींकडून 11 कोटी रुपये वसूल करणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु झालेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीला देखील आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. सुमारे 11 कोटींची वसुली आरोपींकडून करण्यात येणार आहे.

बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी माहिती बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

144 आरोपींना अटक

बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर 2 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

61 बसच्या दुरूस्तीचे काम सुरू

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे समोर आले होते. याचवेळी बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे.

बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित

बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपासात देखील केला जात आहे.

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp