मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक:9 दिवसांच्या आमरण उपोषणामुळे किडनी अन् लिव्हरवर सूज, रोगप्रतिकारक क्षमतेत घट; वजनही घटले
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 9 दिवस आमरण उपोषण केले. त्याचे त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम झालेत. उपोषण सोडल्यानंतर सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
मनोज जरांगे यांनी गुरुवारी सायंकाळी आपले आमरण उपोषण थांबवण्याची घोषणा केली. 9 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. उपोषण सोडल्यानंतर गुरुवारी रात्रीच तातडीने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर डॉक्टर चावरे यांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
काय म्हणाले उपचार करणारे डॉक्टर?
डॉक्टर चावरे यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, जरांगेंची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. त्यांचे वजन पूर्वीपेक्षा जास्त घटले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पूर्ववत होण्यास वेळ लागेल.
ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या शरीराची रोग प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आलेत. त्यांच्या रक्त तपासण्या कालच पाठवण्यात आल्यात. त्याच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या किडनी व लिव्हरवर सूज आली आहे. याविषयी आता योग्य ते उपचार सुरू करण्यात आलेत.
सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी आपले उपोषण मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी आता त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. पण तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजेश टोपेंनी घेतली भेट
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी शुक्रवारी जरांगे यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. त्यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे काल राज्य सरकारचे शिष्टमंडळ व न्या.शिंदे समिती यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीतील टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने दोन महिन्यांच्या कालावधीची मागणी व विनंती केल्यानंतर
जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटल,छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. आज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासंबंधी व योग्य उपचार करण्यासंदर्भात सूचना दिल्या, असे राजेश टोपे म्हणाले.
हे ही वाचा...
माणूस पाणी न पिता किती दिवस जगतो?:शरीरात काय होतात बदल? मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण किती प्राणघातक? वाचा सर्वकाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला सोमवारी 6 दिवस झालेत. या काळात त्यांनी पाण्याचा एक-दोन घोट वगळता काहीही खाल्ले नाही. यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. आता त्यांना उठून बसणेही शक्य होत नाही. ते झोपूनच उपस्थितांशी संवाद साधतात.
सतत सटरबटर खाण्याचे नुकसान आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. पण उपोषण किंवा अन्नत्याग केल्यामुळे शरीरावर कोणते परीणाम होतात हे आपण आज जाणून घेऊया...
यासंबंधीच्या एका शोधनिबंधानुसार, अन्न सेवन न करता व्यक्ती 8 ते 21 दिवस जिवंत राहू शकतो. पण हे व्यक्तीचे वय, आरोग्य, त्याच्या शरीरातील पाण्याची उपलब्धता आदी गोष्टींवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीच्या शरीराला नेहमीची कार्ये पार पाडण्यास पुरेशा कॅलरी मिळत नसल्याच्या स्थितीत त्याच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. वाचा संपूर्ण बातमी...
मराठा आरक्षणाची ठिणगी पुन्हा का पेटली?:कोणत्या राज्यांत लागू आहे 50% हून जास्त आरक्षण? वाचा आंदोलनाचे इथपासून तिथपर्यंत..
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अवघ्या महाराष्ट्रात मोठे वादळ उठले आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. यामुळे काही जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्याची वेळ आली. त्यातच काही लोकप्रतिनिधींनी आरक्षणासाठी आपल्या आमदार व खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे सरकारवरील दबाव चांगलाच वाढला आहे. हा घटनाक्रम व मनोज जरांगे यांची ताठर भूमिका यामुळे या आंदोलनाची धग तूर्त तरी शमणार नसल्याचे चिन्हे आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा का पेटला?
तसे पहायला गेले तर महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची मागणी अनेक दशके जुनी आहे. पण गत ऑगस्ट महिन्यात हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती.
जरांगे यांच्या या आंदोलनाला पोलिसांच्या लाठीचार्जनंतर हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंतरवाली सराटीतील आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी भयंकर लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List