मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशेबाजांचा सुळसुळाट: काँग्रेस चा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का?, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव विरोधात रेव्ह पार्टीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश उत्सवात एल्विश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी आला होता. त्याने गणपतीची आरतीही केली होती. त्याच्या या कार्यक्रमाचे फोटो ट्विट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट... शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य!
गणपती पूजन निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते त्याला सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षा वर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार, असे ते म्हणाले.
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्विस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावले होते.
आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आले होते. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?, असा संतप्त सवाल अतुल लोंढेंनी सरकारला केला आहे.
रेव्ह पार्टी प्रकरणी 3 राज्यांत छापेमारी
नोएडा पोलिसांनी एल्विश यादव प्रकरणी आतापर्यंत 3 राज्यांत छापेमारी केली आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 9 साप जप्त केलेत. यात 5 कोबरा, 1 अजगर व 2 बिनविषारी साप आहेत. पोलिसांनी पार्टीत 20 एमएल विषही हस्तगत केले आहे.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List