सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा:एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठात संघटनेची सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला.
या हाणामारीत दोन्ही बाजुचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पुणे विद्यापीठातील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनुसार, एसएफआयच्या कार्यकर्त्याला अभाविपचे कार्यकर्त्यांनी खाली पाडून मारताना दिसत आहेत. तर, एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एसएफआयचे कार्यकर्ते काठीने मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
सदस्य नोंदणीवरून वाद
विद्यापीठाच्या भोजनगृहाजवळ हा प्रकार घडला. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीवरून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अभाविप यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. त्यात एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. या मारामारीनंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांकडून दोन्ही संघटनांची बाजू ऐकून घेण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठातील सुरक्षा विभागाकडून देण्यात आली. मात्र या मारामारीमुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीतील जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटना एकमेकांना भिडण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. तसाच प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडल्याचे दिसून आले.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List