सर्वपक्षीय आमदारांनी चा राजभवनाबाहेर ठिय्या:मराठा आरक्षणासाठी घेतली राज्यपालांची भेट; तत्काळ विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार - खासदारांनी मुंबई सोडू नये. सरकारवर दबाव गट तयार करा असे सांगितल्यानंतर आता सर्वपक्षीय मराठा आमदारांनी राजभवनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आमदारांनी राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या आंदोलनात राहूल पाटील, लक्ष्मण पवार, बाळासाहेब आजबे , नीलेश लंके, राजू नवघरे, कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी राज्यपालांची वेळ मागितली आहे. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे. जर राज्यपालांनी भेटण्यास बोलावले नाही तर आम्ही कुणाला राजभवनात जाऊ देणार नाही, आणि कुणाला बाहेर देखील येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
नेमके काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन किती फायदा होईल, ते मला माहिती नाही. मात्र, आता मराठा आमदार आणि खासदारांनी गप्प बसू नये. सगळे मराठा आमदार आणि खासदारांनी मुंबईतच थांबावे, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सत्ताधारी आणि विरोधी गटात असलेल्या सर्व आमदारांनी आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारचा पिच्छा सोडू नये. तिकडेच सरकारला धरुन बसा. इकडे आम्ही उपोषणावरुन मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री या सगळ्यांना मिळून एक मोठा गट तयार करावा. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. मंत्रालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दाराबाहेर बसून आरक्षणासाठी सतत पाठपुरावा करा आणि हा विषय मार्गी लावा. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तर मराठा समाजा तुम्हाला कधीही विसरणार नाही.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List