मनोज जरांगे यांचा इशारा:कोणतीही ताकद येऊ द्या, मराठा थांबणार नाहीत; अर्धे नव्हे पूर्ण आरक्षण घेणार

मराठा आरक्षणाचे आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.

भेटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांना दिली. या भेटीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची चर्चा झाली असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील सध्या माध्यमांशी संवाद साधत आहेत. पाहा त्यांनी मांडलेले मुद्दे

  • मुख्यमंत्र्यांना फोनवर मराठा आरक्षणाची मागणी स्पष्टपणे सांगितले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली असल्याचे मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना सांगितले.
  • कोणतीही ताकद येऊ द्या. मराठा थांबणार नाहीत, अर्धे नव्हे पूर्ण आरक्षण घेणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
  • सध्या 60 टक्के मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत आहे. तर उर्वरीत मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याची मागणी आम्ही केली आहे.
  • शेती शब्दाची लाज वाटण्याइतके मराठे खालच्या विचाराचे नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नको, त्यांना प्रमाणपत्राची जबरदस्ती नाही. असे मुख्यमंत्र्यांना फोनवर सांगितले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी समितीचा प्रथम अहवाला स्वीकारावा, तसेच समितीला राज्याचा दर्जा देण्याची मागणी आम्ही केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
  • त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज्य सरकार देखील विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी केली असल्याचे ते म्हणाले.
  • राज्यातील मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. त्याचा अंत पाहू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
  • राज्यातील मराठे हे 100 टक्के शांत आहेत. त्यांनी उद्रेक करु नये, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत. तसेच कोणीही आत्महत्या करु नका, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले. हिंसक आंदोलन न करण्याचे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.
  • राजीनामा देणाऱ्या मराठा आंमदारांचे योगदान मराठा समाज विसरणार नाही. मात्र, राजीनामा देण्यापेक्षा मुंबईत, दिल्लीत मराठा समाजाचा आवाज उठवा, आणि आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. तो पर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे. सध्या व्यवसायाच्या आधारावर अनेक जातींनी आरक्षण घेतले आहे. महाराष्ट्रातील मरठा समाजाचा व्यवसाय अनेक वर्षांपासून शेती आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला तर काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण देण्याची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. तरी देखील मनोज जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवर चर्चा केली. तसेच त्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. मराठा आंदोलन तीव्र झाल्याने जरांगे पाटील आजपासून पिणार पाणी आहेत.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत आजच्या केबिनेटमध्ये ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांना सांगितले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीररित्या सोडवणे गरजेचे असून त्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. या पिटीशनवर सुनावणी घ्यायला न्यायालयाने होकार दिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आणि कायम टिकणारे आरक्षण मिळवून देण्याबाबत शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अर्धवट आरक्षण नको, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा अभ्यासकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच त्या नंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे अंतरवाली सराटी गावात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेवेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांना उपोषणा दरम्यान त्यांनी पाणी घ्यावे म्हणून विनंती करणार आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अंतरवाली सराटीसाठी रवाना

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अंतरवाली सराटीसाठी रवाना झाले आहेत. ते मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहेत. तसेच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरु आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी पाणी पिण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे शाहू महाराज छत्रपती देखील त्यांना पाणी पिण्याची विनंती करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4971 एसटी फेऱ्या रद्द

मराठवाड्यातील 47 पैकी 30 आगारांतील एसटीची बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आंदोलकांनी 13 बस फोडल्या तर दोन दिवसांत एसटीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. बीडमध्ये तहसीलदारांची तीन वाहने फोडण्यात आली आहेत. राज्यातील 1328 गावांत उपोषणे सुरु आहेत. तर शेकडो गावांत पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

gunratn-sadavarte-sanjay-gaikwad34_2023101111173

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp