धिरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारिक दाव्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी: महा. अंनिसची मागणी
धिरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारिक दाव्या विरोधात
कायदेशीर कार्यवाही करावी: महा. अंनिसची मागणी
छ. संभाजी नगर- (माझा मराठवाडा ब्यूरो) स्वत: ला बागेशवर धाम, बजरंग बली, बालाजी यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आध्यात्माच्या नावावर प्रचंड जनसमुदायासमोर चमत्कारयुक्त दावे करून समूहाला अंधश्रध्देच्या गर्तेत ढकलणारा तथाकथित आध्यात्मिक गुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बगेशवर बाबा विरुद्ध जादूटोणा विरोधी कायदा व तत्सम इतर कायद्यान्वये कार्यवाही करावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंनिसच्या छ.संभाजी नगर शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) मसूद खान यांना देण्यात आले आहे.
दि. ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत या तथाकथित बुवाचा कार्यक्रम छ. संभाजी नगर येथे होणार असल्याचे मोठमोठे फ्लेक्स शहरात लागले आहेत. या वरून कार्यक्रमाच्या संयोजनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेही असल्याचे दिसून येते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी डॉ.कराड यांचीही समक्ष भेट घेऊन सदर निवेदन दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे, की धिरेंद्र कृष्ण शास्त्री अध्यात्माच्या नावाने करीत असलेले चमत्काराचे दावे, फल ज्योतिषाचा प्रचार, प्रसार स्वत: कडे वैद्यक शास्त्राची कोणतीही पदवी नसताना लोकांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपाय सांगणे छद्मविज्ञानाचा वापर हे सर्व भंपक प्रकार भारतीय संविधानात प्रत्येक भारतीयांचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांशी विसंगत आहेत. त्यांच्या या अशास्त्रीय दाव्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा तसेच फसवणुकी विरुद्ध कायदा ड्रॅग्ज अँड मॅजिक रेमिडिज (आक्षेपार्ह जाहिराती) अँक्ट १९५४ , मेडिकल प्रॅक्टिशनर अँक्ट आदी कायद्यातील कलमांचा भंग होतो. असे अंनिस चे म्हणणे असून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी. असा चमत्कारिक कार्यक्रम होणार नाही, याची दक्षता घ्यावी. राजकीय दबावापोटी जर कार्यक्रम झालाच तर संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करून ती तपासून बघावी व सदरील बाबावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर राज्य उपाध्यक्षा डॉ.रश्मी बोरीकर, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी वाठोरे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर बनसोडे, जिल्हा प्रधान सचिव प्रशांत कांबळे, गीता कोलटकर, सुनील चौतमल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

.jpeg)


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List